Oral Care : ब्रश केल्यानंतर की करण्याआधी पाणी कधी प्यावं? डेन्टिस्ट काय सांगतात

Last Updated:
दातांचं आरोग्य टिकवायचं असेल तर योग्य क्रम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपल्या डेंटिस्ट काय सांगतात चला पाहू
1/8
दररोज सकाळी उठल्यावर लोक सर्वात आधी एक काम आवर्जून करतात, ते म्हणजे तोंड धुणं, पाणी पिणं आणि मग ब्रश करणं. पण इथेच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की उठल्या उठल्या पाणी प्यावं का की आधी ब्रश करावा आणि मग पाणी प्यावं?

advertisement
2/8
दातांचं आरोग्य टिकवायचं असेल तर योग्य क्रम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपल्या डेंटिस्ट काय सांगतात चला पाहू
दातांचं आरोग्य टिकवायचं असेल तर योग्य क्रम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपल्या डेंटिस्ट काय सांगतात चला पाहू
advertisement
3/8
सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते. रात्रभर पाणी न मिळाल्याने शरीरातील हायड्रेशन कमी होतं. अशावेळी उठल्या उठल्या पाणी पिणं शरीराला ताजेतवाने करतं, पचनसंस्थेला चालना देतं आणि तोंडात रात्री साचलेले बॅक्टेरिया थोडे कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे उठल्यानंतर पाणी पिणं ही एक उत्तम सवय मानली जाते.

4/8
पण ब्रश केल्यानंतर लगेच पाणी पिणं योग्य आहे का?दन्ततज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टमधील फ्लोरोइड दातांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं असतं. ब्रश करून लगेच तोंड धुतलं किंवा भरपूर पाणी प्यायलं तर फ्लोरोइड धुऊन जातं. त्यामुळे त्याचा परिणाम दातांवर टिकत नाही. अमेरिकन डेन्टल असोसिएशनसारख्या संस्थांचा सल्ला आहे की ब्रश केल्यानंतर फक्त थुंकून घ्यावं, पण लगेच पाणी धुवू नये. असं केल्याने फ्लोरोइड दातांवर जास्त वेळ राहून किड लागण्यापासून संरक्षण करतं.
पण ब्रश केल्यानंतर लगेच पाणी पिणं योग्य आहे का?
दन्ततज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टमधील फ्लोरोइड दातांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं असतं. ब्रश करून लगेच तोंड धुतलं किंवा भरपूर पाणी प्यायलं तर फ्लोरोइड धुऊन जातं. त्यामुळे त्याचा परिणाम दातांवर टिकत नाही. अमेरिकन डेन्टल असोसिएशनसारख्या संस्थांचा सल्ला आहे की ब्रश केल्यानंतर फक्त थुंकून घ्यावं, पण लगेच पाणी धुवू नये. असं केल्याने फ्लोरोइड दातांवर जास्त वेळ राहून किड लागण्यापासून संरक्षण करतं.
advertisement
5/8
तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धत काय?सकाळी उठल्यानंतर एक-दोन ग्लास पाणी प्यावं, काही मिनिटांनी ब्रश करावं अशा प्रकारे तुम्ही हायड्रेशनही पूर्ण कराल आणि दातांचं संरक्षणही टिकवून ठेवाल.
तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धत काय?
सकाळी उठल्यानंतर एक-दोन ग्लास पाणी प्यावं, काही मिनिटांनी ब्रश करावं अशा प्रकारे तुम्ही हायड्रेशनही पूर्ण कराल आणि दातांचं संरक्षणही टिकवून ठेवाल.
advertisement
6/8
थोडक्यात सांगायचं तर  पाणी ब्रश करण्याआधी प्यावं आणि ब्रश केल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं. ही छोटीशी सवय तुमच्या दातांच्या आणि एकंदर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

7/8
पण हे लक्षात ठेवा की तुम्ही यासाठी रात्री दात घासणं गरजेचं आहे. असं केल्याने सकाळी तुमचं तोंड फ्रेश रहातं अशावेळी तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिऊ शकता.

8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement