Vande Bharat: मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस 16 बोंगीची, 3 महिन्यात होणार सुरू, नवीन 24 बोगींच्या पीटलाईनचा प्रस्ताव!
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Vande Bharat: जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्या महाराष्ट्रातील रेल्वे सेवेचा वेगाने विस्तार होत आहे. काल (10 ऑगस्ट) नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) मुंबईकडे जाणारी नवीन वंदे भारत सुरू होणार आहे. पुढील तीन महिन्यात ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पीटलाइन आणि सिकलाइनचे काम पूर्ण करावे लागेल. सध्याची पीटलाइन 16 बोगींची आहे. त्यामुळे सुरू होणारी गाडी देखील 16 बोगींची असेल. त्याबरोबरच स्टेशनवर नवीन 24 बोगींची पीटलाइन उभारण्याचा देखील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
10 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली गेली होती. पुढील तीन महिन्यांत ही रेल्वे सुरू करण्याचं आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे.
advertisement
दोन महिन्यांत वंदे भारतचा दुसरा कोटा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरचं औद्योगिक, पर्यटन आणि शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता सकाळच्या वेळेत मुंबईकडे जाण्यासाठी गाडी देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री यांनी दिलं आहे, असा दावा कराड यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमधील पिटलाइनचं काम प्रगतीपथावर आहे. यासह स्लीपलाइन व स्टेबलिंग लाइन आदी कामं देखील भविष्यात पूर्ण होतील. नवीन सीकलाइन 150 मीटरची असेल. सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला 150 जागांचा कोटा मिळावा यासाठी हालचाली सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याला रेल्वेकडून दुजोरा मिळालेला नाही.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 11, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Vande Bharat: मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस 16 बोंगीची, 3 महिन्यात होणार सुरू, नवीन 24 बोगींच्या पीटलाईनचा प्रस्ताव!