घरोघरी वस्तू विकल्या, नातेवाईकांचे टोमणे ऐकले; गृह उद्योगातून प्रणिता करते 15 लाखांची उलाढाल
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरच्या प्रणिता कुलकर्णी गेल्या 13 वर्षांपासून 'पुष्कर गृह उद्योग' चालवत आहे. प्रत्येक सीझननुसार त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि विक्री करतात.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या प्रणिता कुलकर्णी गेल्या 13 वर्षांपासून 'पुष्कर गृह उद्योग' चालवत आहे. प्रत्येक सीझननुसार त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि विक्री करतात. हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडूसह विविध पदार्थ मिळतात. लग्नसराईमध्ये सर्व पदार्थ तसेच नवरात्रीमध्ये उपवासाचे पदार्थ असे सीझननुसार पदार्थ बनवतात. या व्यवसायाच्या माध्यमातून कुलकर्णी यांची वर्षाला 15 लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. तसेच त्यांनी 3 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी 'लोकल 18' दिली.
प्रणिता कुलकर्णी यांनी सुरवातीला हाताने बनवलेल्या शेवया, पापड, हळद-तिखट विकायला सुरवात केली. स्वतःच घरोघरी जाऊन वस्तू विकल्या. नातेवाईकांनी त्यावेळेला म्हणायचे गृह उद्योग करणं आपले काम आहे का? सह असे अनेक टोमणे वैगेरे खाऊन आणि अनेक अडचणींना सामोरे जात हा व्यवसाय उभा केला आहे. लोकांनी देखील प्रणिता यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद दिला. पदार्थांची मागणी वाढू लागली आणि प्रणिता यांचे धैर्यही! मग दागिने मोडून त्यांनी शेवयांची मशीन घेतली, उत्पादन वाढवले आणि 'पुष्कर गृह उद्योग' या नावाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली.
advertisement
मार्केटिंगचे कोणतेही साधन नव्हते, पाठिंबाही नव्हता; पण सातत्य आणि मेहनत होती. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, जळगाव, मुंबई आणि पुण्यापर्यंत त्यांच्या उत्पादनांचा प्रसार झाला. उन्हाळ्यात शेवया, कुरडया, पापड, पापड्या तर दिवाळीत चिवडा, लाडू, बाकरवडी, शंकरपाळे, चकली, अनारसे यांचा सुगंध घराघरांत पोहोचतो. नवरात्री आणि महालक्ष्मी उत्सवात उपवासासाठी लागणारे भगर, राजगिरा, शेंगदाणे लाडू, थालीपीठ पीठ हे सगळं पदार्थही 'पुष्कर गृह उद्योग'मध्ये मिळतात. 'गृह उद्योग' व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम जिद्द पाहिजे, मेहनत करण्याची स्वतःची तयारी पाहिजे, व्यवसायामध्ये प्रचंड कष्ट करावे लागतात तसेच सातत्य राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया देखील कुलकर्णी यांनी दिली.
Location :
Maharashtra
First Published :
Nov 15, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
घरोघरी वस्तू विकल्या, नातेवाईकांचे टोमणे ऐकले; गृह उद्योगातून प्रणिता करते 15 लाखांची उलाढाल








