डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ निघालं जिवंत, अंत्यसंस्काराच्या वेळी घडला चमत्कार, बीडमधील घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Beed News: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्काराच्या वेळी जीवंत असल्याचं आढळलं आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्काराच्या वेळी जीवंत असल्याचं आढळलं आहे. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक बाळ रडू लागलं, यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाळ जीवंत असताना मृत घोषित केल्याने डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्या बाळावर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार घडला आहे. इथं महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेले बाळ मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागले.
यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत, या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केले. या प्रकाराची रुग्णालयात चर्चा होत असून आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टर वर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.
advertisement
केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबाबाबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला? यामध्ये दोषी कोण? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jul 09, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ निघालं जिवंत, अंत्यसंस्काराच्या वेळी घडला चमत्कार, बीडमधील घटना!









