सातारकरांनो, चुकूनही फोडू नका 'फटाके', नाहीतर भरावा लागणार मोठा दंड, ऐन सणासुदीत प्रशासनाचा मोठा निर्णय

Last Updated:

Satara News : सणासुदीचे दिवस सुरू आहे. नुकताच गणेशोत्सव सुरू झाला आहे. पार्श्वभूमीवर सण साजरे करत असताना अनेक जण फटाके फोडतात. पण साताऱ्यात...

Satara News
Satara News
Satara News : सणासुदीचे दिवस सुरू आहे. नुकताच गणेशोत्सव सुरू झाला आहे. पार्श्वभूमीवर सण साजरे करत असताना अनेक जण फटाके फोडतात. पण साताऱ्यात आता फटाके फोडता येणार नाहीत. कारण, साताऱ्यात गणेशोत्सवात प्लास्टिक आणि कागदी तुकडे उडवणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जर या आदेशाचे भंग केले, तर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.
पर्यावरण, स्वच्छतेमुळे घेतला निर्णय
सातारा नगरपालिकेने गणेशोत्सव काळात स्वच्छता, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. सातार्‍यात गणेशोत्सवात ‘सीओ टू पेपर ब्लास्टर’ तसेच इतर प्रकारचे प्लास्टिक आणि कागद उडणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवात पारंपरिक मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक उत्सव साजरे केले जात आहेत. अशावेळी मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण आणि कचरा होतो.
advertisement
कुणाचीही केली जाणार हयगय
फटक्यांमुळे झालेला कचरा त्वरित स्वच्छ करणे कठीण जाते. त्यामुळे रोगराई आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रशासनाकडून फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे फटाके फोडण्यावर सक्त मनाई घालण्यात आली आहे. जी व्यक्ती, आयोजक, सार्वजनिक गणेश मंडळं या नियमांचा भंग करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारकरांनो, चुकूनही फोडू नका 'फटाके', नाहीतर भरावा लागणार मोठा दंड, ऐन सणासुदीत प्रशासनाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement