बीडमध्ये हुंडाबळी; सासरच्या लोकांकडून छळ, विहिरीत आढळला नव्या नवरीचा मृतदेह, शरीरावर अनेक जखमा अन्...
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लेकीला त्रास नको म्हणून सोनालीच्या घरच्यांनी म्हणजे माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये दिले, तरीसुद्धा सासरची मंडळी तिला त्रास देत होती.
बीड : सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. परंतु वैष्णवीप्रमाणे बीडमध्ये हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनाली बाळू वनवे (वय २२) हिचा मृतदेह 31 ऑगस्ट रोजी सासरच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला. विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांतच सोनालीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीचा दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्या अवघ्या महिनाभरानंतरच सासरच्या लोकांनी पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली होती. लेकीला त्रास नको म्हणून सोनालीच्या घरच्यांनी म्हणजे माहेरच्या लोकांन पाच लाख रुपये दिले, तरीसुद्धा सासरचे लोक तिला त्रास देत राहिले.
मृतदेहावर अनेक जखमा
सोनालीने या अत्याचाराबाबत आपल्या आईला आणि माहेरच्या लोकांना अनेकदा सांगितले होते. “मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचे नाही” असे सांगत नवरा आणि सासरचे वारंवार वाद घालून तिचा छळ करत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली. शोध घेतला असता तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत सापडला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे पंचनाम्यात पोलिसांनी नोंदवले आहे.
advertisement
हत्या की आत्महत्या?
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनालीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्याविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहे.
हुंड्यासाठी आणखी एका विवाहितेचा गेला जीव
advertisement
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहानंतर केवळ हुंड्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा जीव गेला, ही बाब समाजाला हादरवून सोडणारी आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत असून पोलिस तपासाचा पुढील अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 10, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये हुंडाबळी; सासरच्या लोकांकडून छळ, विहिरीत आढळला नव्या नवरीचा मृतदेह, शरीरावर अनेक जखमा अन्...








