महिन्याभरापूर्वीच विवाह, काही दिवस सुखी संसार, मग वादाला सुरुवात, आधी बायकोने आणि नंतर नवऱ्याने जीवन संपवलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Beed Couple Suicide: महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या बीडमधील नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सुरेश जाधव, बीड : बीड तालुक्यातील केतुरा येथे नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आज गुरुवारी पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे.
लग्नानंतरचा पहिला महिना नवरा-बायकोसाठी विशेष आनंदाचा आणि स्मरणीय असतो. हा काळ नव्या नात्याचा, नवीन जबाबदाऱ्यांचा आणि परस्परांना अधिक समजून घेण्याचा असतो. पण याच काळात नवदाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबीय अतिशय तणाखाखाली आहेत.
महिन्याभरापूर्वीच विवाह, काही दिवस सुखी संसार, मग वादाला सुरुवात, शेवटी नको ते घडलं...
अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही पुण्याला राहत होते. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार सुरू होता. मात्र त्यानंतर सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी पुन्हा आपले गाव गाठले.
advertisement
मात्र गावात येताच या ना त्या कारणावरून सारखे वाद होत राहिले. गुरुवारी शुभांगीने आत्महत्या केली तर शुक्रवारी पहाटे शुभमने देखील गळफास घेत आत्महत्या केली. अक्षयच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांनी कळली, त्यावेळी त्याच्या आईने टाहो फोडला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दोघांच्या आत्महत्येने मात्र परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
advertisement
सोलापुरातही दाम्पत्याने जीवन संपवले, आधी नवऱ्याने मृत्यूला कवटाळलं, मग बायकोनेही आयुष्याला पूर्णविराम दिला
सोलापुरात कौटुंबिक वादाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर पुढच्या काही तासांतच बायकोनेही आयुष्याला पूर्णविराम दिल्याची घटना घडली. विनायक बाबूराव पवार (वय ३०) आणि पूजादेवी विनायक पवार (वय २५ रा. दोघेही रा. भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत.
advertisement
विनायक पवार याने शनिवारी घराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येनंतर बायकोनेही सोमवारी तिथेच जाऊन गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांना दोन छोटी मुलं होती. आई वडिलांच्या आत्महत्येनंतर चिमुरडे पोरकी झाली आहेत.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
April 03, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिन्याभरापूर्वीच विवाह, काही दिवस सुखी संसार, मग वादाला सुरुवात, आधी बायकोने आणि नंतर नवऱ्याने जीवन संपवलं


