वडिलांनी भावाला लगेच निलेशकडे जायला सांगितलं; तो पोहोचला, पण घरातील दृश्य पाहून उडाला थरकाप

Last Updated:

नीलेशच्या वडिलांनी हरिभाऊ यादव यांना फोन करून नीलेश काय करत आहे, याची विचारपूस करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्यावरून हरिभाऊ नीलेशच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना धक्काच बसला.

घरातील दृश्य पाहून हादरला (AI Image)
घरातील दृश्य पाहून हादरला (AI Image)
पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे (राजगड) तालुक्यातील सुरवड येथून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. यात एका २३ वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नीलेश बाजीराव साबळे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 जानेवारी रोजी घडली. नीलेशच्या वडिलांनी त्याचा आत्याचा मुलगा हरिभाऊ यादव यांना फोन करून नीलेश काय करत आहे, याची विचारपूस करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्यावरून हरिभाऊ जेव्हा नीलेशच्या घरी पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. नीलेशने नायलॉनच्या दोरीने घराच्या छताला गळफांस घेतल्याचं त्यांना आढळून आलं.
advertisement
या घटनेनंतर लक्ष्मण रामभाऊ यादव यांनी तातडीने राजगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. नीलेश हा अवघ्या २३ वर्षांचा होता, अशा तरुण वयात त्याने आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही.
advertisement
राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मांडके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नीलेशच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून माहिती घेऊन आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. ऐन उमेदीच्या काळात एका तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने सुरवड गावात दुःख व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वडिलांनी भावाला लगेच निलेशकडे जायला सांगितलं; तो पोहोचला, पण घरातील दृश्य पाहून उडाला थरकाप
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement