Beed :"माझ्या गाडीवर फाईन का मारला?", धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने थेट पोलिसांची कॉलर पकडली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बुलेटवर फॅन्सी नंबर आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न लावल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. बीडमधील टोळक्यांची दहशत काही केल्या थांबत नाहीए, आता तर त्यांना पोलिसांचीही भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उभा निर्माण झालाय. कारण बीडमध्ये थेट वर्दीवर हात घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्या गाडीवर तू दंडात्मक कारवाई का केलीस? म्हणत कॉलर पकडून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला वाहन चालकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना बीड शहरात उघडकीस आली .ही या प्रकरणी वाहनचालक अशोक लक्ष्मण बांगर यांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसाने त्याला रोखत कारवाई केली. परंतु माझ्यावर कारवाई का केली असे म्हणत पोलिसांना धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अटक करण्यात आली आहे. आरोपी अशोर बांगर याचे धनंजय मुंडेसोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत.
advertisement
माझ्या गाडीवर का फाइन मारला?
वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार सिद्धांत रमेश गोरे हे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकाच्या 'इन-आऊट' गेटवर वाहनांवर कारवाई करत होते. त्यावेळी एमएच 03 बीआर 9613 क्रमांकाच्या बुलेटवर फॅन्सी नंबर आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न होते. त्यामुळे गोरे यांनी कारवाई केली. याचा राग आल्याने अशोक लक्ष्मण बांगर याने माझ्या गाडीवर का फाइन लावला? असे विचारत गोरे यांच्याशी वाद घातला.
advertisement
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
अशोक बांगर याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed :"माझ्या गाडीवर फाईन का मारला?", धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने थेट पोलिसांची कॉलर पकडली


