बीडच्या महिलांचा दुर्गावतार! रस्त्यावर उतरल्या, तरुणाला धू धू धुतला; काय आहे प्रकरण?
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
महिलांनी तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बीड: बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ शहरात रेल्वे स्टेशन परिसरात एक मद्यधुंद तरुण धिंगाणा घालत असताना महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. तीन दिवसांपूर्वी याच रेल्वे स्टेशनवर एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोदन करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
परळी शहरात काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरात महिला आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मूक मोर्चा काढला. हा मोर्चा परळी रेल्वे स्टेशनवर पोहोचला. याच वेळी, स्टेशनच्या आवारात एक तरुण दारू पिऊन मोठा गोंधळ घालत होता. तो इतरांना शिवीगाळ करत होता, ज्यामुळे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांमध्ये संताप वाढला.
advertisement
लाथा-बुक्क्यांनी मारहाण
मोर्चातील महिलांनी मद्यधुंद तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न केला,मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याला पकडले आणि त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. समज दिल्यानंतरही तो शिवीगाळ करत असल्याने महिलांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तरुण पोलिसांच्या ताब्यात
या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि घेतलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे समाजकंटकांना एक कडक संदेश मिळाला आहे. महिलांनी दाखवलेल्या एकजुटीमुळेच आज हा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं परळीमध्ये?
पंढरपूर येथून एक कुटुंब मुलांसह परळी रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशनवरच जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याचवेळी एका नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीला फसवून स्थानकावरील उड्डाणपुलाकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अत्याचारानंतर आरोपी पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेतलं अन् आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर आरोपी चिमुकलीला हाताला धरून घेऊन जाताना दिसत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या महिलांचा दुर्गावतार! रस्त्यावर उतरल्या, तरुणाला धू धू धुतला; काय आहे प्रकरण?