Beed: पालावर राहिले, सुया पोती विकल्या, पोराला पैलवान केलं, लेकराने पांग फेडलं, सुवर्ण पदकाची कमाई

Last Updated:

परिस्थितीशी झुंज देत सनी फुलमाळीने सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. अठरा विश्व दारिद्र्याला चितपट करून सनी फुलमाळीने विजय मिळवला.

सनी फुलमाळी
सनी फुलमाळी
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळी या 17 वर्षाच्या तरुणाने 60 वजनी गटात बहरीनमध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परिस्थितीशी झुंज देत सनी फुलमाळीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
बीडच्या छोट्याशा पाटसरा गावातील सुभाष फुलमाळी यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पुणेच्या लोहगावमध्ये पाल ठोकून राहिले. अठरा विश्व दारिद्र्य असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवणेच मुश्कील असताना घरात तीन पैलवान बनवणे मोठे धैर्याचे काम होते. पण फुलमाळी यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलाला पैलवान बनवले. आई वडिलांनी पुण्यासारख्या शहरात दारोदारी जाउन सुया पोती विकून मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी काबाडकष्ट केले.
advertisement
रोज सकाळी उठून स्वतः वडिलांनी मुलांना घरीच कुस्तीचे डाव शिकवत होते. मोठ्या कष्टाने आम्ही मुलाला घडवले. मुलाच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्हाला घर द्यावे. आमदार धनंजय मुंडे यांनी एक वर्षापूर्वी आम्हाला मदत केल्याने आज हे यश पहायला मिळते, अशी प्रतिक्रिया सनीच्या आई वडिलांनी दिली. तर पालावर राहणाऱ्या सनीने मला ऑलिंपिक जिंकायची आहे. सरकारने मदत करावी, अशी मागणी
advertisement
पाटसरा गावचे सरपंच अभय गर्जे यांनी सनी फुलमाळी यांच्या पालावर जाऊन जंगी स्वागत केले. तसेच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लवकरच सनी फुलमाळीचा नागरी सत्कार करून त्याला आर्थिक मदत देऊ, असे सांगितले.
पालावर राहणाऱ्या मुलाने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत देशाचे नाव रोशन केले आहे तसेच ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळविण्याची जिद्द चिकाटी आणि स्वप्नही पाहत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: पालावर राहिले, सुया पोती विकल्या, पोराला पैलवान केलं, लेकराने पांग फेडलं, सुवर्ण पदकाची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement