advertisement

चालत्या एसटीचे दोन टायर्स निखळले, ७० प्रवासी थोडक्यात वाचले, बीडमधला थरारक प्रसंग

Last Updated:

Beed News: मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर अचानक मागच्या बाजूचे दोन टायर एक पूर्वेला तर दुसरे पश्चिमेला निखळून पडले. सुदैवाने भीषण अपघात होता होता टळला.

बीड एसटीचे टायर निखळले
बीड एसटीचे टायर निखळले
सुरेश जाधव, बीड : चालत्या एसटी बसचे टायर निखळल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या मांजरसुंबा येथे उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर-लातूर ही बस लातूरच्या दिशेने जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर अचानक मागच्या बाजूचे दोन टायर एक पूर्वेला तर दुसरे पश्चिमेला निखळून पडले. सुदैवाने भीषण अपघात होता होता टळला.
अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ७० प्रवासी अगदी थोडक्यात बचावले. यामुळे एसटी बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.
लातूर बस्थानकाचे भंडेराव सदाशिव या चालकाच्या प्रसंगावधानामुळे ७० प्रवासी वाचले. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणत थांबवली. टायर निखळून पडले त्यावेळेला बस मधून ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. मात्र भंगारात घालण्याची वेळ आलेल्या अनेक बसेस रस्त्यावर धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे जीव रोज धोक्यात आहेत, अशा उद्विग्न भावना प्रवाशांनी घटनेनंतर बोलून दाखवल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चालत्या एसटीचे दोन टायर्स निखळले, ७० प्रवासी थोडक्यात वाचले, बीडमधला थरारक प्रसंग
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement