Walmik Karad: 'वाल्मिकची अटकच बेकायदेशीर', बीडच्या कोर्टात 3 तास खडाजंगी; कराडच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वाल्मिक कराड याला जामीन देऊ नये आणि विष्णू चाटेचा दोष मुक्ती अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यात वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर तब्बल तीन तास युक्तिवाद करण्यात आला. तसेच विष्णू चाटे यांच्या दोष मुक्ती अर्जावरही युक्तिवाद करण्यात आला. वाल्मिक कराड याचे वकील सत्यव्रत जोशी यांनी तब्बल 1.45 मिनिट युक्तिवाद केला. त्यानंतर विष्णू चाटेचे वकील शहा यांनी दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. वाल्मिक कराड याला जामीन देऊ नये आणि विष्णू चाटेचा दोष मुक्ती अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये तब्बल तीन तास आरोप प्रत्यारोप आणि युक्तिवाद चालला.
advertisement
वाल्मिक कराडचे वकील सत्यव्रत जोशी यांनी युक्तिवाद करताना जामीन देण्यात यावा यासाठी प्रामुख्याने खालील मुद्दे मांडले.
वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद
- गुन्हेगारी टोळी यावर आक्षेप घेत दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्हा संदर्भात मांडणी केली. यात 19 गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यासमवेत एकही या प्रकरणातील आरोपी नाही. त्यातील 11 गुन्हे हे 1 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणारे आहेत. संघटित गुन्हेगारी या सर्व आरोपीने एकत्रित केलेली गुन्हे कुठे आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोषारोप पत्र दाखल केलेला एकाच गुन्हा एकत्र दिसत आहे. त्यामुळे मकोका लावण्यास सक्षम ग्राउंड्स नाहीत..(बॉम्बे हायकोर्टाचे जुन्या निकालाचे संदर्भ देण्यात आले, यात महम्मद सय्यद केस, गोपाल पांडे केस)
- वाल्मिक कराडवर मकोका ? असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केला. तसेच यावेळी मकोका लावताना, सक्षम ग्राउंड नव्हते. त्यानंतर तीनही गुन्ह्याचे दोषारोपपत्र एकत्र दाखल कसे केले. वाल्मिक कराड यांचे सी आय डी चे तपासणी अधिकारी यांच्या 5 जानेवारीच्या अहवालात नाव नाही.. फायनल अहवालात नाव नाही.
advertisement
वाल्मिक कराडवर दाखल असलेले गुन्हे मकोका लावण्यासाठी सबळ आहेत का? 1999 पासूनच्या केसचा दोषारोप पत्रामध्ये उल्लेख आहे.
advertisement
advertisement
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल बनसोडे आणि दादासाहेब खिंडकर यांचा जवाब 10 डिसेंबर 2024 चा आहे. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी शिवराज देशमुख यांचा मूळ फिर्यादी यांचा जॉब यामध्ये तफावत आहे.
advertisement
advertisement
विष्णू चाटेच्या वकिलांचा युक्तिवाद
- विष्णू चाटे त याच्यावर अगोदर कुठलाही गुन्हा नाही साधी एनसी पण नाही. महेश आणि जयराम याच्या जबाबत विष्णू चाटेचा उल्लेख नाही.
- सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे.. यात सुनील शिंदे च्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आले नाहीत नंतर क्रिएट केले आहे. व्हिडिओ हा पण सुनील शिंदे यांच्या मोबाईल मधील नाही. सुदर्शन घुले गँग लीडर आहे तर गँग लिडरला विष्णू चाटे कसं सांगू शकतो.
सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद
- 29 नोव्हेंबर रोजी कॉल संदर्भात सी डी आर पुरवा.. 63 सेकंद .. 29 डिसेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज..
- संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील वैभवी अश्विनी आणि धनंजय देशमुख यांच्या जबाबाचा उल्लेख..
- वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने जुळले आहेत. यासंदर्भात फॉरेन्सिक तपासणी अहवाल..
आरोपीचे वकील शहा
- सीडीआरच्या पुराव्यावर आक्षेप घेतला.. तसेच फिर्यादीने दिलेल्या जवाबाचा उल्लेख केला..
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 18, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad: 'वाल्मिकची अटकच बेकायदेशीर', बीडच्या कोर्टात 3 तास खडाजंगी; कराडच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद








