कुत्र्याची मदत करायला कुटुंबानं गाडी थांबवली अन् मुलालाच गमावलं, बीडमधील मन हेलावणारी घटना!

Last Updated:

Beed News: बीड जिल्ह्याच्या राजुरी नवगण गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका कुत्र्याला मदत करत असताना चिमुकल्याला गमवावं लागलं आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
बीड : बीड जिल्ह्याच्या राजुरी नवगण गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका कुत्र्याला मदत करत असताना चिमुकल्याला गमवावं लागलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजुरी नवगण गावात शोककळा पसरली आहे. स्वराज रामदास ननवरे असं मृत पावलेल्या 7 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी स्वराज आपले आई वडिलांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्याच्या कडेला एका भटक्या कुत्र्याचं मुंडकं बरणीत अडकलेलं दिसलं. त्यामुळे कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं दुचाकी थांबवली. पण त्यानंतर घडलेल्या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी मृत मुलाचे वडील रामदास ननवरे आपला मुलगा स्वराज आणि पत्नी स्वाती यांच्यासह बीड शहरात खासगी कामानिमित्त गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने परत आपल्या गावी राजुरी नवगणच्या दिशेनं निघाले. बीड शहरापासून काही अंतर लांब गेल्यानंतर या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला एक कुत्र दिसलं. या कुत्र्याचं मुंडकं प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं. मुंडकं काढता येत नसल्याने कुत्रं वेदनेनं विव्हळत होतं. हे पाहून कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं गाडी थांबवली.
advertisement
तिघे दुचाकीवरून उतरून कुत्र्याची मदत करणार होते, तितक्यात पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या दुचाकीनं या कुटुंबाला धडक दिली. गाडीचा हँडल स्वराजच्या डोक्यात लागला आणि तो गंभीर जखमी झाला. तर या अपघातात रामदास यांच्या पत्नी स्वाती यांनाही दुखापत झाली. अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
advertisement
एका कुत्र्याला मदत करण्यासाठी थांबलेल्या कुटुंबावर अशाप्रकारे काळानं घाला घातल्याने राजुरी नवगण गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रामदास ननवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
कुत्र्याची मदत करायला कुटुंबानं गाडी थांबवली अन् मुलालाच गमावलं, बीडमधील मन हेलावणारी घटना!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement