'स्वतःच्या आई-वडिलांना...', एकेकाळी राईटहँड असलेल्या माणसाने धनूभाऊंवर केली जहरी टीका
- Published by:sachin Salve
Last Updated:
'माझ्यासोबत बीड जिल्ह्यातील जनता आहे. जनतेच्या जीवावर ही निवडणूक मी लढत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवावर ही निवडणूक लढवत नाही'
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : 'स्वतःची मुलगी निवडून आणता आले नाही हे खरं आहे मात्र मुलाच्या जीवनात बायको मुलं आई-वडील महत्त्वाचे असतात. धनंजय मुंडे यांना आई-वडिलांना ही निवडून आणता आले नाही, असं म्हणत पहिल्यांदाच मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.
महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनवणे बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड इथं नतमस्तक झाले. यावेळी श्रद्धास्थान असलेल्या नगर नारायणाच्या चरणी नतमस्तक होत खासदार करण्याचं साकडं घातलं. यावेळी माध्यमांशी बोलताना सोनवणेंनी थेट धनंजय मुंडेंवरच निशाणा साधला.
advertisement
'शरदचंद्र पवार साहेब यांनी विश्वास टाकून दुसऱ्यांदा मला लोकसभेची उमेदवारी दिली ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. मला यां निवडणुकीत कुठलेही आव्हान वाटतं नाही. जनतेनं आणि सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. गेल्या दहा वर्षात काय केलं काय नाही केलं त्याचा हिशेब विरोधकांना द्यावा लागेल, अशा इशारा सोनवणेंनी दिला.
advertisement
'मागच्या वेळेस ची जनता माझ्यासोबत होती. बीड जिल्ह्यातील आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित राहून ताकतीने ही निवडणूक लढवणार आहोत. आदरणीय ज्योतीताई पण इच्छुक होत्या. त्यांच्याकडे मी आदराने पाहतो. बीड जिल्हा त्यांच्याकडे आदराने पाहतो, बीड जिल्ह्याला काय हवं ते सर्वांनी करावं, असंही सोनवणे म्हणाले.
'बीड जिल्ह्यात न राहणारे उमेदवार आल्यावर काय आव्हानं असायचं'
पंकजा मुंडे यांनी दिलेल्या शुभेच्छाच्या जोरावरती मी खासदार होऊन संसदेत जाईल. आवाहन तगडं आहे की नाही हे येणारा काळ ठरवेल.माझ्यापुढे काहीही आव्हान नाही. बीड जिल्ह्यात राहून आव्हानाला सामोरं जावं लागतं. बीड जिल्ह्यात न राहणारे उमेदवार आल्यावर काय आव्हानं असायचं, बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हे खासदार झाल्यावर मी दाखवून देईल हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन साखर कारखाना स्थापन केला आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्धी निर्माण केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देऊन मी त्यांना ज्ञान येत आहे. कुणाचाही एक रुपया ठेवलेला नाही. मी दुसऱ्या सारखा एफआरपी दोन दोन वर्ष थकून ठेवत नाही, असं म्हणत सोनवणेंनी पंकजा मुंडेंनी निशाणा साधला.
advertisement
'कोणत्याही व्यक्तीच्या जीवावर ही निवडणूक लढवत नाही'
view comments'माझ्यासोबत बीड जिल्ह्यातील जनता आहे. जनतेच्या जीवावर ही निवडणूक मी लढत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवावर ही निवडणूक लढवत नाही. प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. कुठल्या नेत्याला नाही बीड जिल्ह्यातील जनताच नेत्यांचे प्रारब्ध ठरवेल. औकात कशावर काढायचे पैशावर काढायची का माझी औकात नाही माझी औकात नाही म्हणूनच मी साखर कारखाना उभा केला, तो कारखाना औकात नाही वेळेत भाव देतोय कुठलाही शेतकऱ्यांचा एक रुपया ठेवला नाही. कुणाच्या जमिनी फुकट घेतली नाही, कुठलीही केस माझ्यावरती नाही, असं म्हणत सोनवणेंनी मुंडेंवर निशाणा साधला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2024 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
'स्वतःच्या आई-वडिलांना...', एकेकाळी राईटहँड असलेल्या माणसाने धनूभाऊंवर केली जहरी टीका









