"माझ्यासमोर वाल्मिक कराडचा फोन आला", अण्णाला बीडच्या जेलमध्ये स्पेशल ट्रिटमेंट?

Last Updated:

Ambadas Danve On Walmik Karad : छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून वाल्मिक कराड फोनद्वारे सुत्र हलवत असल्याचा बॉम्ब अंबादास दानवे यांनी टाकलाय.

 Walmik Karad gets special treatment in beed jail
Walmik Karad gets special treatment in beed jail
Walmik Karad gets special treatment : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात आहे. बीड जिल्हाच्या मध्यवर्ती तुरूंगात कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात होती, असा आरोप वारंवार केला जात होता. अशातच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी मोठा खुलासा केला असून वाल्मिक कराडला स्पेशल ट्रिटमेंट दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

माझ्यासमोर वाल्मिकचा फोन आला - अंबादास दानवे

वाल्मिक कराडसह बीडमधील काही कुख्यात गुंड बीडच्या तुरुंगात आहेत. मात्र, या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच आता अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं. आताही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement

चौकशी झालीच पाहिजे, दानवेंची मागणी

गेल्या तीन महिन्यांपासून आरोप केले जात आहेत, त्यामुले चौकशी झालीच पाहिजे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी, जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता, अशी माहिती समोर आली होती. आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कारागृहातील पोलिस गोविंद भालेराव आणि रामअप्पा परळकर यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल लपवलेला असल्याचे उघडकीस आलं होतं.
advertisement

अंगझडतीत गांजाचे पुडे सापडले

दरम्यान, त्याआधी कारागृहातील दुसऱ्या एका कैद्याच्या अंगझडतीत गांजाचे पुडे सापडले होते. या सलग घडणाऱ्या सुरक्षाभंगाच्या घटनांनी जिल्हा कारागृहातील यंत्रणा गोंधळात सापडली आहे. कैद्यांकडून मोबाईल आणि अंमली पदार्थ आत आणले जात असतील, तर त्यामागे कोणाचा हात आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
"माझ्यासमोर वाल्मिक कराडचा फोन आला", अण्णाला बीडच्या जेलमध्ये स्पेशल ट्रिटमेंट?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement