पोलीस अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, घरात कुणी नसताना संपवलं जीवन, बीडमधील खळबळजनक घटना

Last Updated:

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पोलीस अधिकाऱ्याने अचानक आपलं आयुष्य संपवलं आहे.

News18
News18
बीड: बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पोलीस अधिकाऱ्याने अचानक आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. मात्र मागील चार महिन्यांपासून ते कर्तव्यावर नव्हते. एप्रिल २०२५ मध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. तेव्हापासून नागरगोजे हे नैराश्यात होते. यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना समोर आली. परळी तालुक्यातील नागदरा हे त्यांचे मूळ गाव असले तरी, ते अनेक वर्षांपासून कुटुंबीयांसह अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते.नागरगोजे यांनी परभणी, लातूर, आणि बीड या जिल्ह्यांत सेवा बजावली होती.
advertisement
परभणी येथे एका पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर चौकशी सुरू होती. बीडला बदली झाल्यावरही त्यांनी एका कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याच कारणांमुळे एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या घटनेनंतर ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या वेळी नागरगोजे अंबाजोगाई येथील भाड्याच्या घरात एकटेच होते. त्यांची पत्नी मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला गेल्या होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. नागरगोजे यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
पोलीस अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, घरात कुणी नसताना संपवलं जीवन, बीडमधील खळबळजनक घटना
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement