Beed Crime : गोट्या गितेसाठी पोलिसांची फिल्डिंग, महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT ने घेतला मोठा निर्णय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahadev Munde Case SIT announced reward : महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती थेट एसआयटी प्रमुख, आयपीएस पंकज कुमावत यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Parali Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाला २१ महिन्यांनंतर वेग आला. विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख पंकज कुमावत जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. अशातच महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती थेट एसआयटी प्रमुख, आयपीएस पंकज कुमावत यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल
एसआयटीने एक परिपत्रक काढून नागरिकांना या संदर्भात आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती थेट एसआयटी प्रमुख, आयपीएस पंकज कुमावत यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
थेट संपर्क साधण्याचं आवाहन
या परिपत्रकात आयपीएस पंकज कुमावत यांचा मोबाईल नंबरही देण्यात आलेला आहे, जेणेकरून नागरिक थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. एसआयटीने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे.
परिपत्रकात नेमकं काय म्हटलं? पाहा पत्र जसंच्या तसं
advertisement
स्वर्गीय श्री महादेव दत्तात्रय मुंडे रा. भोपला ता. परळी वै. ह.मु. बॅक कॉलनी परळी वै. यांची दि. २१/१०/२०२३ रोजी रात्री ०८.०० ते ९.०० वा. च्या दरम्यान परळी कोर्टासमोरील मोकळ्या मैदानात हत्या झालेली असून सदर प्रकरणा संबंधाने पोलीस ठाणे परळी शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा रजिस्टर नं.१९१/२०२३ कलम ३०२. भां.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
advertisement
सदर गुन्हयातील आरोपीतांचा अद्याप पावेतो शोध न लागल्याने IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्यात आली असून. SIT पथकाने पुढील तपास सुरु केलेला आहे. स्वर्गीय श्री. महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्ये बाबत काही माहिती असल्यास अथवा त्या बाबतची माहिती देणे असल्यास. IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांना त्यांचा वैयक्तिक मो. ९९९०७८२४३१ वर माहिती देवु शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपणीय ठेवण्यात येईल. माहिती देणाऱ्याचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड केले जाणार नाही. तसेच माहिती देणाऱ्यास उचित बक्षीस देण्यात येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : गोट्या गितेसाठी पोलिसांची फिल्डिंग, महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT ने घेतला मोठा निर्णय!









