advertisement

Beed Crime : बायको शिवमहापुराण कथा ऐकायला गेली इकडं नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल! सहा महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, पण...

Last Updated:

Beed Crime Krushna ladda Ends life : वडील खताच्या दुकानात कामासाठी गेले होते, तर आई आणि पत्नी माजलगाव येथे आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या.

Beed Crime Krushna ladda Ends life
Beed Crime Krushna ladda Ends life
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील टाकरवण गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गावात राहणाऱ्या एका तरुण व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचे लग्न झालेले नव्हते; केवळ 6 महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह समारंभ पार पडला होता आणि तो आपल्या नव्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करत होता. पण असं काय झालं? ज्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं?

आई आणि बायको शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेली अन्...

कृष्णा नंदकिशोर लड्डा (वय 27) असं या मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितलं जात आहे. शुक्रवारी, 12 तारखेला, आठवडी बाजार असल्यामुळे त्याचे वडील खताच्या दुकानात कामासाठी गेले होते, तर आई आणि पत्नी माजलगाव येथे आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. घरी कुणी नसताना, कृष्णाने घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement

बापाच्या पायाखालची जमीनच सरकली

दुपारी सुमारे 12.30 वाजता त्याचे वडील जेवण करण्यासाठी घरी परतले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर उघड झाला. लेकाला लटकेला पाहून बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. लड्डा कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. कृष्णा हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याला दोन बहिणी आहेत. आई, वडील आणि पत्नी असा त्यांचा छोटा परिवार होता. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : बायको शिवमहापुराण कथा ऐकायला गेली इकडं नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल! सहा महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, पण...
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement