advertisement

बिझनेस पार्टनर जीवावर उठला, बीडमध्ये शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, मध्यरात्री मदत मागितली मग...

Last Updated:

Crime in Beed: बीड शहरालगत असणाऱ्या पालवण गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.

News18
News18
बीड: बीड शहरालगत असणाऱ्या पालवण गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. मध्यरात्री आरोपींनी मदत मागण्याच्या बहाण्याने शिवसेना पदाधिकाऱ्याला घराबाहेर बोलावलं. यानंतर दबा धरलेल्या नराधमांनी शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला दुसरा तिसरा कुणी नव्हे तर बिझनेस पार्टनरनेच केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
विलास भारत म्हस्के असं हल्ला झालेल्या ३२ वर्षीय शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक आहेत. म्हस्के यांच्यावर गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास मस्के गुरुवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला. यावेळी म्हस्के यांच्या बहिणीने दार उघडले असता, एका अनोळखी व्यक्तीने 'गाडीतील पेट्रोल संपले आहे, पेट्रोल हवे आहे,' असे कारण सांगितले. अपरात्री एक अनोळखी व्यक्ती मदत मागत असल्याने विलास म्हस्के बाहेर आले. ते बाहेर येताच दबा धरून बसलेल्या अन्य चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.
advertisement
या हल्ल्यात विलास म्हस्के यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विलास म्हस्के यांच्या तक्रारीवरून त्यांच्या व्यावसायिक भागीदारासह अनोळखी पाच हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बिझनेस पार्टनर जीवावर उठला, बीडमध्ये शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, मध्यरात्री मदत मागितली मग...
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement