भाजीपाला न्यायला बोलावलं अन् शेतात एकटं गाठलं, महिलेसोबत..., बीड पुन्हा हादरलं!

Last Updated:

Beed News: मानसिक धक्का बसलेल्या महिलेने हिंमत दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.

Beed News: भाजीपाला न्यायला बोलावलं अन् शेतात एकटं गाठलं, महिलेसोबत..., बीड पुन्हा हादरलं! (Ai Photo)
Beed News: भाजीपाला न्यायला बोलावलं अन् शेतात एकटं गाठलं, महिलेसोबत..., बीड पुन्हा हादरलं! (Ai Photo)
बीड: गेल्या काही काळात गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शेतातील भाजीपाला देण्याचे आमिष दाखवून 35 वर्षीय विधवा महिलेला एकाकी ठिकाणी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसांनी तातडीची कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेची माहिती अशी की, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेला शेतात भाजीपाला घेण्यासाठी येण्यास सांगितले. महिला शेतात पोहोचल्यानंतर तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के (वय 57) याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर मानसिक धक्का बसलेल्या महिलेने हिंमत दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.
advertisement
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अमजद सय्यद आणि जमादार मोरे यांनी माहिती संकलन करून आरोपीचा शोध घेतला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला तासाभरात ताब्यात घेतले.
advertisement
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासासाठी वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
भाजीपाला न्यायला बोलावलं अन् शेतात एकटं गाठलं, महिलेसोबत..., बीड पुन्हा हादरलं!
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement