Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला सुट्टी नाही! मुख्य सूत्रधार सापडला? विशेष मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे वाल्मीक कराडला दोषमुक्त केलं जाऊ शकत नाही, असं मकोका कोर्टाने म्हटलं आहे.
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं आहे. या हत्याकांडात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. कराडने आपल्या वकिलांमार्फत बीड न्यायालयात दोषमुक्तीसाठी (discharge) अर्ज सादर केला होता. या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने काही प्रमुख मुद्दे मांडले आहेत, ज्यामुळे वाल्मीक कराडला दोषमुक्त का केले जाऊ शकत नाही? याचं उत्तर दिलं आहे.
वाल्मीक कराडला दोषमुक्त का केलं नाही?
न्यायालयाने वाल्मीक कराडला दोषमुक्त न करण्यामागे खालील प्रमुख निरीक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये वाल्मिक कराड टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून हत्या केल्याचं समोर आले आहे. तसेच वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे वाल्मीक कराडला दोषमुक्त केलं जाऊ शकत नाही.
advertisement
वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या
आवादा एनर्जी प्रकल्प चालकाला धमक्या देणं. त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड याचा जमीन फेटाळण्यात आल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jul 30, 2025 12:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला सुट्टी नाही! मुख्य सूत्रधार सापडला? विशेष मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण!









