विद्यार्थी, युवकांना मोठे स्वप्न दाखवणाऱ्या 'स्वप्नपूर्ती'ला सर्वतोपरी साथ, नाना पटोलेंचा शब्द

Last Updated:

Bhandara Swapnapurti Sanstha: विद्यार्थी आणि युवकांसाठी कार करणाऱ्या स्वप्नपूर्ती संस्थेच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन 'मोती सन्मान आणि पारितोषिक वितरण’ कार्यक्रमात आमदार नाना पटोले यांनी केले.

स्वप्नपूर्वी बहुउद्देशीय संस्था
स्वप्नपूर्वी बहुउद्देशीय संस्था
लाखनी : भंडारा जिल्ह्यात स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेसारखा विद्यार्थी, युवकांसाठी काम करणारे एक व्यासपीठ आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या संस्थेला माझं पाठबळ हे कायम असेल असे प्रतिपादन आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले. स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने 'मोती सन्मान आणि विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण’ कार्यक्रम लाखनी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला नानाभाऊ पटोले यांच्यासह खंडविकास अधिकारी धीरज पाटील, चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त वकील दीपक चटप, जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, किशोर वाघाये, संजय वनवे, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे यांची प्रमुख होती. याप्रसंगी स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा आजवरचा प्रवास विशद करणारी एक चित्रफीत आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशनसोबत काम करणाऱ्या युवकांनी सुरू केलेल्या 'इनसाईट जंक्शन' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे विमोचन देखील यावेळी नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पार पडले.
advertisement
याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची मोठी गरज आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आपल्यामोर आहे. आजच्या विद्यार्थ्यांना, युवकांना तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्याची गरज आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून नवे शिखरे गाठण्याची गरज आहे आणि या गोष्टींसाठी विविध उपक्रमांची गरज आहे. यासाठी स्वप्नपूर्ती संस्था काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो, असेही नाना पटोले म्हणाले.
advertisement
याप्रसंगी बोलताना धीरज पाटील म्हणाले की, मी लाखनीत कार्यरत असताना मला स्वप्नपूर्ती संस्थेचे काम बघता आले. कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात अशी संकल्पना येणे आणि त्यावर त्यांनी सलग काम करणे ही कल्पनाच मुळात मोठी आहे आणि ती त्यांनी साकारली. या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास, भाषा व संभाषण कौशल्य, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उच्च शिक्षण विषयक मार्गदर्शन, मोती सन्मान असे उपक्रम घेतले. हे उपक्रम काळाची गरज आहे. तर मनीषा निंबार्ते म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापूर्वीपासून मी या संस्थेचा भाग आहे. आपल्या भागातील मुलांना नवनवीन गोष्टी मिळाव्यात, यासाठी ही संस्था प्रयत्न करते. आजवर अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांना या संस्थेने विद्यार्थ्यांसोबत जोडून दिले. विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधता आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चांगली पिढी घडवणे हे काम करण्याची गरज असताना स्वप्नपूर्ती संस्था हे काम करत आहे. समाज म्हणून त्यांच्या कामाचा अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्षमता विकास, व्यक्तिमत्व विकास, भाषा व संभाषण कौशल्य अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली आणि असे उपक्रम आगामी काळात राबविण्यात येतील. यासाठी विविध शाळा महाविद्यालय यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

दीपक चटप यांची लंडनहून खास उपस्थिती

चेव्हनिंग स्कॉलर दीपक चटप यांची या कार्यक्रमाला लंडनहुन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असताना माहितीच्या अभावामुळे दिशा मिळत नाही. हीच दरी भरून काढण्यासाठी स्वप्नपूर्ती संस्था काम करत आहे आणि या कामामध्ये लाखनी, साकोली परिसरात मलाही त्यांच्यासोबत सहभागी होता आले. आगामी काळात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम सोबत मिळून राबवूया. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे सहकार्य लाभावे, असे आवाहन चटप यांनी केले.
advertisement
स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांना मोती सन्मान देऊन गौरविण्यात येते. यंदा मूळचे भंडारा जिल्ह्यातील असलेले आणि सध्या स्पेनमध्ये वास्तव्यास असलेले लेखक व चित्रपट निर्माते रोशन रोशन भोंडेकर, प्रो कबड्डीसह विविध राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याचे नाव क्रीडाविश्वात नावारूपास आणणारे आकाश पिकलमुंडे आणि स्पर्धा परिक्षांच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणींसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक कार्यातही सक्रीय असलेले उमेश कोर्राम या ३ मान्यवरांना मोती सन्मान प्रदान करण्यात आला.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण देखील याप्रसंगी पार पडला. यामध्ये निबंध स्पर्धेत सानू भाऊराव घोनमोडे, आरोही मनोज पिपरेवार, शर्वरी संजय खेडीकर यांना एका गटात तर विशाखा विनायक भुसारी, राजश्री एस. टेंभरे, लीना बबन कातोरे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत हर्षा व्ही. निखाडे, अक्षरा टी. मिरासे, यादवी सी. गोस्वामी, पर्णवी के. मरस्कोले यांना तर दुसऱ्या गटात सृष्टी सुनील रोकडे, धनश्री डी. मेश्राम यांनाही प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक अनुक्रमे प्रदान करण्यात आले.
advertisement
स्वप्नपूर्ती संस्थेच्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगेश बेहलपांडे यांनी केले तर मोती सन्मान आणि पारितोषिक प्रदान कार्यक्रमाबद्दल सुधीर काळे, विशाल हटवार यांनी माहिती दिली आणि लिखित पुडके यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश राऊत, नितेश टिचकुले, आशिष राऊत, भीष्म लांडगे, अनिकेत नगरकर, दुर्गेश टिचकुले यांचे सहकार्य लाभले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विद्यार्थी, युवकांना मोठे स्वप्न दाखवणाऱ्या 'स्वप्नपूर्ती'ला सर्वतोपरी साथ, नाना पटोलेंचा शब्द
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement