भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिली; चिपळूणमधील धक्कादायक प्रकार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लग्नाचे आमिष देऊन एका असहाय्य अल्पवयीने मुलीचे शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजेश जाधव, प्रतिनिधी
चिपळूण : चिपळूणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा धाक दाखवत आणि लग्नाचे आमिष देऊन एका असहाय्य अल्पवयीने मुलीचे शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलीसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
चिपळूणमधील भाजप पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम यांनी एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिला धमकी देऊन जबरदस्तीने तिच्यावर वारंवार लैंगिक शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याचा धक्कादयक प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीनुसार पदाधिकाऱ्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्यस्थितीत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, चिपळूणमधील भाजप पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम राहणार कापसाळ यांनी एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवले. पदाधिकाऱ्याने धमकी देऊन जबरदस्तीने ती अल्पवयीन आहे ही माहिती असताना सुद्धा वारंवार लैंगिक शारीरिक संबंध ठेवून अल्पवयीन पीडित बालिकेला गर्भवती केले. याबाबत पीडित बालिकेने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयित आरोपी मंदार कदम याला चिपळूण पोलिस यांनी ताब्यात घेतले. सद्यस्थितीत चिपळूण पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत आहे. प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणे कडून सुरू असून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे
advertisement
मंदार कदमचे अनेक कारनामे
भाजपचा पदाधिकारी मंदार कदम हा पक्षातील बड्या नेत्याचा निकटवर्तीय आहे. तर एका बड्या पदाधिकाऱ्याचा पर्सनल असिस्टंट असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पक्षाच्या अनेक कार्यक्रमात निवेदन करताना दिसून येतो. मात्र सदरच्या प्रकरणात चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्या मोबाईल मधील अनेक कारनामे समोर आले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Chiplun,Ratnagiri,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिली; चिपळूणमधील धक्कादायक प्रकार









