वाळू माफियांना भाजप प्रवेश, आमदार देशमुख संतापले, नेतृत्वाला जाहीर इशारा, जर प्रवेश मागे घेतले नाही तर...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून भाजपात आलेल्या स्थानिक नेत्यांच्या पक्ष प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली.
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र वाढलेल्या पक्ष प्रवेशांवरून पक्षातच फटाके फुटत आहेत. वाळू माफियाला पक्षात घेतल्याने भाजप आमदार आशिष देशमुख यांनी थेट पक्ष नेतृत्वाशी पंगा घेतला आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र पिंपळे, अमित राय, विक्की पाटील, संदीप नारनवरे, सचिन राय, चंद्रकांत शेंडे, रणजीत बागडे, अतुल ढोरे, बॉबी गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खरा पण त्यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक नेते दुखावले आहेत.
advertisement
वाळू माफियांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख संतापले
सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून भाजपात आलेल्या स्थानिक नेत्यांच्या पक्ष प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली. वाळू माफियांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख यांनी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली. सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून देशमुख कमालीचे नाराज झाले आहेत.
advertisement
जर प्रवेश मागे घेतले नाही तर...
भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने संबंधित पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश मागे घ्यावेत. पक्ष प्रवेश मागे घेतले नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा आशिष देशमुख यांनी इशारा दिला आहे. सावनेर येथील नगरपरिषद भाजप उमेदवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत कार्यालयातून तडकाफडकी बाहेर पडले.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 24, 2025 3:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाळू माफियांना भाजप प्रवेश, आमदार देशमुख संतापले, नेतृत्वाला जाहीर इशारा, जर प्रवेश मागे घेतले नाही तर...


