BJP Office: पैसेच नाही! भाजप पक्ष कार्यालयाची विज कापली, पालिकेनंही चिकटवली जप्तीची नोटीस

Last Updated:

देशात सगळ्यात जास्त सदस्य संख्या आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या बदलापूर भाजप पक्ष कार्यालयाची ही दुरवस्था पाहून आता तरी कोणी पुढाकार घेऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढे येईल का?

(बदलापूरमधील भाजप कार्यालय)
(बदलापूरमधील भाजप कार्यालय)
बदलापूर : महाराष्ट्रामध्ये सध्या भाजप महायुतीचं सरकार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपणच मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलं. पण राज्यात भाजपची सत्ता असली तरी  मुंबईजवळील बदलापूर शहरात भाजप कार्यालयाची बिकट अवस्था असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर विज बिल आणि मालमत्ता कर भरायला सुद्धा पक्ष कार्यालयाकडे पैसे नाहीत. त्यामुळे पक्ष कार्यालयाचे विज बिल थकल्यानं वीज मीटर कापण्यात आलंय.
बदलापूर शहरात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नंदकुमार पातकर, शरद तेली आणि संजय भोईर हे दिग्गज नेते असतांना पक्ष कार्यालयाची अशी अवस्था असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या या कार्यालयाचं गेल्या अनेक दिवसांपासून विज भरलं नाही. त्यामुळे महावितरणने मिटर कापून नेलं आहे.  तसंच मालमत्ता कराची थकबाकी असल्याने पक्ष कार्यालयाला पालिकेनं जप्तीची नोटीस देखील चिटकवली आहे.
advertisement
या कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. जागोजागी फरशा निघालेल्या आहेत. भिंतींना तडे गेलेत, अनेक भिंती ओलाव्यामुळे खराब झाल्यात. मात्र भाजपाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या कार्यालयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी कार्यालयाचे डागडूजी करण्यासाठी मदतीचा आश्वासन दिलं होतं. मात्र अजून पर्यंत ती मदत कार्यालयापर्यंत पोहोचली नसल्याने भाजप कार्यालयाची दुरावस्था दिवसेंदिवस आणखीनच बिकट होत चालली आहे. देशात सगळ्यात जास्त सदस्य संख्या आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या बदलापूर भाजप पक्ष कार्यालयाची ही दुरवस्था पाहून आता तरी कोणी पुढाकार घेऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढे येईल का? हे बघावं लागेल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Office: पैसेच नाही! भाजप पक्ष कार्यालयाची विज कापली, पालिकेनंही चिकटवली जप्तीची नोटीस
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement