आदित्य ठाकरेंच्या वरळीत या 7 सर्वाधिक चुरशीच्या लढती, शिंदे vs ठाकरे थेट लढत, भाजप-शिंदेसेनेने तगडा डाव टाकलाय!

Last Updated:

BMC Election Worli Tough Fight: वरळी भागातील मतमोजणी एकूण १४ टेबलावर पार पडणार आहे. कमीत कमी ४ तर जास्तीत जास्त ८ राऊंड मध्ये मतमोजणी पार पडेल, असे आयोगाने स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई : प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या संघर्षात आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरशीच्या लढती होतील, असे सांगितले जाते. वरळी भागात गिरणी कामगार, बीडीडीवासीय तसेच उच्चभ्रू लोकही राहतात. मराठीचा टक्काही अधिक आहे. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन होऊन निकाल कोणत्याही क्षणी पलटण्याची शक्यता अधिक असते. तसेच आदित्य ठाकरे यांना वरळीतच हादरा देऊन आगामी काळातील इरादे स्पष्ट करण्याची रणनीती भाजप-शिंदेसेनेने आखलेली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उमेदवार देऊन ठाकरेंना चितपट करण्याचा शिंदेसेनेचा डाव आहे.
बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५– २६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होत आहे. वरळी भागातील मतमोजणी एकूण १४ टेबलावर पार पडणार आहे. कमीत कमी ४ तर जास्तीत जास्त ८ राऊंड मध्ये मतमोजणी पार पडेल, असे सांगितले गेले. सुरुवातीला १९३ आणि १९४ प्रभागाची मतमोजणी पार पडेल. त्यानंतर १९५ आणि १९६, मग १९७ आणि १९८ तर सगळ्यात शेवटी १९९ प्रभागाची मतमोजणी होणार आहे.
advertisement
वरळी विधानसभा क्षेत्रातील महापालिका निवडणूक संघर्षाला आज पूर्णविराम मिळेल. वरळीकरांनी निवडून दिलेले नगरसेवक कोण? हे आज स्पष्ट होईल. आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना रंगला.
वरळीतील स्थानिक वर्ग धार्मिक बलाबल
मराठी भाषिक : 55–60%
मुस्लिम : 20–25%
उत्तर भारतीय / गुजराती / इतर : 15–20%

प्रमुख लढती वरळीत काय होत्या?

advertisement
वॉर्ड १९३
१) हेमांगी वरळीकर माजी नगरसेविका आणि आत पुन्हा ठाकरेंची उमेदवार
२) सूर्यकांत कोळी अपक्ष, ठाकरे यांचा शाखा प्रमुख
३) प्रल्हाद वरळीकर शिंदे सेना
४) अभिजित नागवेकर राष्ट्रवादी दादा गट
मुख्य लढत-ही तिरंगी लढत
कोळीवाड्यात हेमांगी नगरसेविका आहेत, माजी उप महापौर
वरळीकर कोस्टल प्रोजेक्टमुळे स्थानिक नाराज आहेत
सूर्यकांत कोळी १५ वर्ष शाखा प्रमुख आहेत, आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा ठेवलाय
advertisement
पुनर्विकास प्रश्न, आणि झोपडपट्टी माफियांचा हैदोस, त्यामुळे कोळीवाड्यात इतर धर्मीय आणि प्रांतीय आक्रमण वाढतंय
मराठी टक्का या परिसरात मोठा आहे, ६०%
इतर भाषिक ४०%

वॉर्ड १९५

संतोष खरात माजी नगरसेवक , परंतु यंदा उमेदवारी नाही, आरक्षण बदलामुळे, आता शिंदे सेनेत आहेत
१) विजय भणगे ठाकरेंचे शाखा प्रमुख रिंगणात
२) राजेश कांबळे भाजपचे
advertisement
मुख्य लढत या दोघांमध्ये
मराठी टक्का ६५%
गुजराती २५%
बाकी इतर भाषिक तेलगू ९ हजार आहेत, आणि तो भाजपकडे वळलेला आहे .
भाजपचा सक्रिय कार्यकर्ता राजेश कांबळे आहे.
अप्पर वरळी, लोवर परळ म्हणून ओळखला जाणारा भाग
मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू परिसर मिश्रण आहे
गिरणी कामगार याच परिसरात राहतात , bdd वसाहत याच मतदारसंघात आहेत
advertisement
BDD पुनर्विकास सुरू आहे, पण श्रेयवादाची लढाई सुरू आहे

वॉर्ड १९६

१) आशिष चेंबूरकर २५ वर्ष नगरसेवक होते, आता त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत
२) सोनल दीपक सावंत भाजपा
३) संगीता विकास जगताप , माजी शाखा प्रमुख
४) राष्ट्रवादी नीलम कांबळे
५) प्रतिभा मनोज परब अपक्ष आहेत.  त्यांचे पती मनोज परब सामाजिक कार्य करत आहेत.
advertisement
६) मानसी दळवी अपक्ष उभ्या आहेत, त्या आधी नगरसेवक होत्या, त्यांचे पती देखील नगरसेवक राहिलेत

वरळीतील सर्वाधिक चुरस असलेला मतदारसंघ

या मतदारसंघात मराठी टक्का सर्वाधिक ७०% आहे, मुस्लिम १५%  आहेत.
प्रेम नगर, सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्प प्रश्न आज.
आणि उरलेला सगळा भाग उच्चभ्रू वस्तीचा, उंच इमारतींचा आहे .
पोलिस वसाहत, गावरमेंट कॉलनी आहे

वॉर्ड १९७

१) दत्ता नरवणकर मनसेतून ठाकरेंकडे आले होते, आता शिंदे सेनेतून त्यांच्या पत्नी वनिता दत्ता नरवणकर उभ्या आहेत
२) मनसेकडून रचना विकास साळवी
३) श्रावणी देसाई ठाकरे सेनेची बंडखोर, पूर्ण शाखेने इथे बंडखोरी केलीय
जिजामाता नगर परिसर आहे
मराठी बरोबरच मुस्लिम मतदार अधिक असणारा भाग
मराठी ६०%
मुस्लिम २०%
बाकी उत्तर भारतीय
पुनर्विकास, रेसकोर्स विकास, मद्रास वाडी, महात्माफुले नगर पुनर्विकास

वॉर्ड १९८

या आधी स्नेहल आंबेकर १० वर्ष नगरसेविका होत्या, आणि ठाकरेंचा नगरसेवक
आरक्षण आता बदलल्याने नवा उमेदवार
१) अबोली गोपाळ खाड्ये, ठाकरे सेना
२) वंदना गवळी, शिंदे सेना
चाळींच्या पुनर्विकासाचा मुख्य प्रश्न आहे, दोन्ही उमेदवार बाहेरचे आहेत
डिलाईल रोड bdd चाळ भाग, पुनर्विकास प्रश्न आहे, गिरणी कामगारांचा भाग
संपूर्ण मराठी मतदारसंघ आहे

वॉर्ड १९९

१) किशोर पेडणेकर माजी नगरसेविका, माजी महापौर आणि आता पुन्हा ठाकरेंच्या उमेदवार
२) रुपल राजेश कुसळे, शिंदे सेना
राजेश कुसले आधी शाखा प्रमुख होते आणि आता शिंदे सेनेत आहेत
मुख्य लढत दोघांमध्ये आहे
मराठी बहुल भाग आणि काही उत्तर भारतीय आहेत
धोबी घाट पुनर्विकास, चाळ पुनर्विकास प्रश्न महत्वाचा आहे
कुसळे २३ वर्ष शाखा प्रमुख होते, त्यामुळे त्यांचं प्रस्थ आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आदित्य ठाकरेंच्या वरळीत या 7 सर्वाधिक चुरशीच्या लढती, शिंदे vs ठाकरे थेट लढत, भाजप-शिंदेसेनेने तगडा डाव टाकलाय!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement