advertisement

BMC Election: मुंबईत मोठा उलटफेर, पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, शिंदेंच्या बड्या नेत्याच्या वहिनीला धूळ चारली

Last Updated:

Congress : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपलं खातं उघडलं. बीएमसी वॉर्ड क्रमांक काँग्रेसच्या आशा काळे यांनी आपला पहिला विजय मिळवला आहे.

मुंबईत मोठा उलटफेर, पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने,  शिंदेंच्या बड्या नेत्याच्या वहिनीला धूळ चारली
मुंबईत मोठा उलटफेर, पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, शिंदेंच्या बड्या नेत्याच्या वहिनीला धूळ चारली
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपलं खातं उघडलं. बीएमसी वॉर्ड क्रमांक काँग्रेसच्या आशा काळे यांनी आपला पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गट आणि मनसेला पराभवाचा धक्का दिला आहे.
वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा १४५० मतांनी पराभव केला. शिंदे गटाने या वॉर्डमधून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शेवाळे यांना हा मोठा धक्का आहे. वैशाली शेवाळे या माजी नगरसेविका आहेत.  ठाकरे गट आणि मनसेच्या पारुबाई कटके यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement

वर्षा गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात यश...

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना आपल्या बालेकिल्ल्यात पहिलं यश मिळालं आहे. धारावी हा काँग्रेस आणि गायकवाड कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. याच वॉर्डमधून काँग्रेसने आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबईत मोठा उलटफेर, पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, शिंदेंच्या बड्या नेत्याच्या वहिनीला धूळ चारली
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement