रक्षाबंधनच्या आदल्यादिवशी गडचिरोलीत धक्कादायक घटना, शोरूममध्ये स्लॅब कोसळला, 3 जणांचा जागेवरच मृत्यू

Last Updated:

आरमोरी इथं ही घटना घडली आहे. पन्नास वर्षे जुनी ही इमारत असून या ठिकाणी हिरो या दुचाकी वाहनाच्या शोरूम दुकान आहे.

News18
News18
 गडचिरोली : गडचिरोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरमोरी येथील एका दुचाकी वाहनाच्या शोरूमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झालसा आहे. तर ३ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमध्ये शोरूमचं प्रचंड नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील  आरमोरी इथं ही घटना घडली आहे. पन्नास वर्षे जुनी ही इमारत असून या ठिकाणी हिरो या दुचाकी वाहनाच्या शोरूम दुकान आहे. रक्षाबंधनाच्या आदल्यादिवशी शोरूममध्ये गर्दी होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास मागच्या बाजूचा भिंत आणि स्लॅबचा काही भाग त्या ठिकाणी असलेल्या दोन कामगार आणि एका ग्राहकावर कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. स्लॅबच्या ढिगाराखाली दबून ३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहे.
advertisement
स्लॅबखाली दबलल्यामुळे जागेवर ३ जणांचा मृत्यू झाला. शोरूममधील इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि ढिगाराखाली दबलेल्या इतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. त्यांना तातडीने आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. इमारत जुनी असल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेमुळे शोरूमध्ये उभ्या असलेल्या नव्या कोऱ्या दुचाकींचं मोठं नुकसान झालं. अनेक दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. शोरूममधून ढिगारा बाजूला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रक्षाबंधनच्या आदल्यादिवशी गडचिरोलीत धक्कादायक घटना, शोरूममध्ये स्लॅब कोसळला, 3 जणांचा जागेवरच मृत्यू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement