Buldhana Accident : सकाळी आवरून घरातून निघाले पण शाळेत पोहोचलेच नाही; शिक्षकाला रस्त्यातच मृत्यूनं गाठलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात असलेल्या दोन शिक्षकांना मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत इरफान शाह लुकमान शाह (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला.
बुलडाणा (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : आज सकाळी शाळेत जात असतानाच भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खामगांववरून पिंपळगाव राजाला दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात असलेल्या दोन शिक्षकांना मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत इरफान शाह लुकमान शाह (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृद्यदावक घटना घडली आहे. दरम्यान दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात गंभीर झालेल्या शिक्षकाचं नाव रफीउद्दीन शहाउद्दिन असं आहे . जखमी शिक्षकावर खामगाव येथील रुग्णाल्यात उपचार सुरु आहेत. हे दोघेही शिक्षक पिंपळगाव राजा येथे कार्यरत होते. अपघातानंतर मृतक शिक्षकाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती..
advertisement
आज सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेले असतानाच ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की इरफान शाह लुकमान शाह यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर डोकं आपटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांनी घटनास्थळीच शेवटचा श्वास घेतला. तर, दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला.
advertisement
ठाण्यात 3 महिन्यात 12 अपघात -
view commentsदरम्यान ठाणे घोडबंदर मार्गावर तीन महिन्यात 12 अपघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आता तरी बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आलं होतं. परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं केल्यानं पुन्हा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे हा रस्ता प्रवाशांसाठी आता घातक ठरू लागला आहे. मागील तीन महिन्यांत रस्त्यावर 12 गंभीर अपघात घडले असल्याची नोंद काशिगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2024 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana Accident : सकाळी आवरून घरातून निघाले पण शाळेत पोहोचलेच नाही; शिक्षकाला रस्त्यातच मृत्यूनं गाठलं


