advertisement

'अजून हिशोब बाकी, एकएकाला फोडल्याशिवाय राहणार नाही'; संजय गायकवाड का संतापले?

Last Updated:

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाच्या ताफ्यासह मेहकरमध्ये दाखल झाले. त्यांनी यावेळी बोलताना आरोपींना इशारा दिला आहे.

News18
News18
बुलढाणा, 14 नोव्हेंबर, राहुल खंडारे : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा घातला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी-काठीसह दगडांनी मारहाण केली. तसेच टोळक्याने घरात घुसून सामानाची तोडफोड केली. या घटनेबाबत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाच्या ताफ्यासह मेहकरमध्ये दाखल झाले. त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदारांची भेट घेतली. तसेच झालेल्या प्रकाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील संजय गायकवाड यांचा राग शांत झालेला नाही. माझा हिशोब बाकी आहे, त्यांना जामीन मिळाल्यावर एकाएकाला फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे,
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा घातला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी-काठीसह दगडांनी मारहाण करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
'अजून हिशोब बाकी, एकएकाला फोडल्याशिवाय राहणार नाही'; संजय गायकवाड का संतापले?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement