Buldhana : अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये; बँक खात्यातली रक्कम पाहून पोलीस चक्रावले
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयाची रोकड बँकेत, लाखो रुपये आणि काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पाहून अनेक जण चक्रावून गेले होते.
राहुल खंडारे, बुलढाणा, 11 नोव्हेंबर : बुलढाणा जिल्ह्यात अपघातात मरण पावलेल्या एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिकाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात दीपक मोरे नामक हा भिकारी गंभीरित्या जखमी झाला होता. त्याला सुरुवातीला मेहकर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले. तिथे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
अपघातात मृत्यूमुखी पडलेला हा भिकारी कोण आहे ? कुठचा आहे ? याचा तपास घेण्यासाठी अपघातस्थळी पोलिसांनी जाऊन तपासणी केली. त्याची सायकल, एक गोधडी आणि पिशवी आढळून आली. या गोधडीतून तब्बल एक लाख 63 हजार रुपये नगदी स्वरूपात पोलिसांना मिळून आले. याशिवाय चिल्लर, विविध बँकेची पासबुक, एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड देखील आढळून आले आहे.
advertisement
भिकाऱ्याजवळ मिळून आलेल्या पासबुकमध्ये देखील लाखो रुपयांची रक्कम जमा असल्याचे स्पष्ट झाल आहे. एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयाची रोकड बँकेत, लाखो रुपये आणि काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पाहून अनेक जण चक्रावून गेले होते. पोलिसांनी या भिकाऱ्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्या कुटुंबीयांना ही संपूर्ण रक्कम बँक पासबुक आणि सर्व साहित्य सुपूर्द केल आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2023 11:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये; बँक खात्यातली रक्कम पाहून पोलीस चक्रावले


