Buldhana News : ड्रायव्हिंग स्कूल चालकाला महिलांनी भररस्त्यात चोपलं; केली होती अश्लील मागणी

Last Updated:

Buldhana News : शेगाव येथे महिलांची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला भररस्त्यात मारहाण केली.

महिलांनी भररस्त्यात चोपलं
महिलांनी भररस्त्यात चोपलं
बुलढाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम ऐरणीवर येत असतो. अनेकदा यात न्याय मिळतो तर काहीवेळा गुन्हेगाराचं फावतं. जिल्ह्यात अशाच एका घटना महिलांनी जाग्यावरच आरोपीचा हिशोब चुकता केला आहे. अश्लील वर्तन करुन छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप दिला. त्याच्या गळ्यात चपलेचा हार घालून पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शेगाव येथे हा प्रकार घडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे महिला मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप देऊन त्याला चपलेचा हार घातल्याची घटना घडली. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील असून त्याचे नाव ज्ञानेश्वर कुकडे असे आहे. आरोपीचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चोप दिला. नंतर चपलेचा हार घालून पोलीस स्टेशनपर्यंत नेले. हा प्रकार घडतेवेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.
advertisement
मिरजेत तरुणीने कपडे फाटेपर्यंत धुतलं
29 जानेवारी 2024 ला सकाळी एका तरुणीने रोडरोमिओची भररस्त्यात मारहाण करत पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. भर रस्त्यावर मारहाण करत तरुणाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचं कौतुकही होत आहे. आरोपी तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार आहे. त्याने या तरुणीचा छेड काढल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. छेड काढल्याने संतापलेल्या तरुणीने तिथेच तरुणाला मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाला मारहाण करीत त्याची धिंड काढली. हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही मध्ये कैद‌ झाला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची अद्याप तरी नोंद झाली नसल्याचे समजते. परतु, या घटनेने टवाळखोर तरुणांवर या घटनेने जबर वचक बसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : ड्रायव्हिंग स्कूल चालकाला महिलांनी भररस्त्यात चोपलं; केली होती अश्लील मागणी
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement