Buldhana Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणानं गमावला जीव, बुलढाण्यातील घटनेनं खळबळ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे प्रतिनिधी : बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दीपक सिसोदिया असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर राजेंद्र कांडेलकर असं आरोपीचं नाव आहे. राजेंद्र कांडेलकर यानं दीपक यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी राजेंद्र कांडेलकर याला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं धारदार शस्त्रानं वार करुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील सनी पॅलेस जवळील मुक्तेश्वर आश्रमासमोर घडली आहे.
सुटाळपुरा भागातील रहिवासी असलेले दीपक सिसोदिया हे घराकडे जात होते. त्याचवेळी त्यांना फरशी परिसरात राहणारा राजेंद्र कांडेलकर हा भेटला. आरोपी राजेंद्र कांडेलकर यानं दीपक सिसोदिया यांना दारू पिण्याकरता पैशांची मागणी केली. मात्र दीपक सिसोदिया यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने पैसे देण्यासाठी बळजबरी केली, त्यावरून दीपक आणि आरोपीमध्ये वाद झाला.
advertisement
दरम्यान राजेंद्र कांडेलकर याने दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्यानं दीपक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत दीपक हे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दीपक सिसोदिया यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी तपासचक्र फिरवत आरोपी राजेंद्र कांडेलकर याला ताब्यात घेतलं आहे.
view commentsLocation :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
April 27, 2024 6:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणानं गमावला जीव, बुलढाण्यातील घटनेनं खळबळ


