हॉस्टेलमधील मुलावर शिक्षकाचा अत्याचार, दोन महिन्यांपासून सुरू होतं घृणास्पद कृत्य, बुलढाण्यातील प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका शिक्षकाने हॉस्टेलमधील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. नराधम आरोपी मागील दोन महिन्यापासून सातत्याने मुलाचं लैंगिक शोषन करत होता. पीडित विद्यार्थ्यानं या घटनेची माहिती आईला दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला गजाआड केलं आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
विनायक देशमुख असं नराधम आरोपीचं नाव आहे. तो पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात अधीक्षक आहे. त्याने शासकीय वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार केला आहे. हा घृणास्पद प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केल असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ६८, ११८ (१) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केला आहे.
advertisement
आरोपी विनायक देशमुख हा पेठ येथील रहिवासी आहे. त्याने मागील दोन महिन्यांपासून सातत्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलाने त्याच्यासोबत सुरू असलेल्या कृत्याची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत.
advertisement
दुसऱ्या एका घटनेत पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात देखील अशीच एक घटना घडली होती. येथील एका शैक्षणिक संस्थेत पाहुणा बनून आलेल्या नराधम आरोपीनं हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना आता बुलढाण्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 08, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
हॉस्टेलमधील मुलावर शिक्षकाचा अत्याचार, दोन महिन्यांपासून सुरू होतं घृणास्पद कृत्य, बुलढाण्यातील प्रकार


