Rain Updates : सुणासुदीला डोक्यावरील छप्पर उडालं; गारपीटीने या जिल्ह्यांना झोडपलं, Video समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Rain Updates : कडक उन्हाळ्यात विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : राज्यात कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना आज अनेक जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या कडाक्यात पावसानेही हजेरी लावली. उन्हाळा सुरू झाला असला तरीही विदर्भासह काही भागात पावसाचे वातावरण आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात विदर्भासह इतर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. आज बुलढाणा, अकोल्यासह जळगाव जिल्ह्यात सपाटून पाऊस कोसळला.
घरावरील छप्पर उडाले
बुलडाणा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीटसह पावसाच्या सरी बरसल्या. तुफान गारपीटी आणि वारा वादळामुळे गणेशपुर, शिराळा, पाळा, उंद्रीसह अनेक ग्रामीण भागात शेतीच्या पिकांचे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्या पावसाच्या फटक्यात अनेकांचे घरांचे छप्पर उडून गेले असून शेतकरी वर्ग ही हवालदिल झाला आहे.
advertisement
Rain Updates : सुणासुदीला डोक्यावरील छप्पर उडालं; गारपीटीने या जिल्ह्यांना झोडपलं, Video समोर
अकोल्यात शेतकऱ्यांना मोठा फटका
अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दुपारपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होत. विजेच्या कडकाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सध्या अकोल्याचं तापमान 40 अंशावर पोहचलं आहे. आज आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेत पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
advertisement
अकोल्यातील पातुर आणि बाळापूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. तीन ते चार वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला आंबा, लिंबू, टरबूज इत्यादी फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवेमुळे मोठमोठी झाडे उलथून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारपिटीमुळे आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह जामनेर तालुक्यात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला गहू व कापूस पिकाचे नुकसान झाले. जामनेर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यामुळे इलेक्ट्रिक पोल वाकले, घरावरचे पत्रे उडून गेली सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून मात्र नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
April 09, 2024 6:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Rain Updates : सुणासुदीला डोक्यावरील छप्पर उडालं; गारपीटीने या जिल्ह्यांना झोडपलं, Video समोर


