Vel Amavasya: मराठवाड्यातील गावांमध्ये शुकशुकाट, वेळ अमावस्या कशी होती साजरी?
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:sachin Salve
Last Updated:
गावातील मंडळींबरोबरच नोकरदार मंडळी देखील या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. वेळ अमावस्येच्या दिवशी शेतामध्ये तुरीच्या शेंगापासून बनवण्यात येणारी भजी आणि आंबील हे विशेष आकर्षण असतं.
जालना : मराठवाड्यामध्ये आज वेळ अमावस्येचा उत्साह पाहायला मिळाला. कर्नाटक लगत असलेल्या नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये विशेष करून वेळ अमावस्या साजरी केली जाते. मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी अमावस्या शेतामध्ये साजरी करण्याची परंपरा आहे. वेळ अमावस्या साजरी होणाऱ्या गावांमध्ये या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळतो. गावातील मंडळींबरोबरच नोकरदार मंडळी देखील या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. वेळ अमावस्येच्या दिवशी शेतामध्ये तुरीच्या शेंगापासून बनवण्यात येणारी भजी आणि आंबील हे विशेष आकर्षण असतं. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये वेळ अमावस्या कशा पद्धतीने साजरी होते याबाबत लोकल18 ने लातूर ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांच्याकडून माहिती घेतली.
advertisement
मराठी महिन्यातील सातवा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या महिन्यात येणारी अमावस्या कर्नाटक लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तसंच लगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे. 30 डिसेंबर रोजी असलेली वेळ अमावस्या देखील लातूर, नांदेड भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. टाका पासून बनवलेलं आंबील आणि तुरीच्या शेंगांच्या दाण्यापासून तसंच शेतातील गवार आणि इतर शेंगांच्या दाण्यापासून बनवलेली भजी या दिवशी विशेष आकर्षण असते. त्याचबरोबर प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार, शेतातील रानमेव्याचा बेत आखत असतो. जेवणावेळी पूर्ण झाल्यानंतर शेतातीलच मोठ्या झाडाला झोका बांधून झोका खेळला जातो.
advertisement
सुरुवातीला शेतामध्ये कडब्याची कोप तयार करून त्यामध्ये मातीपासून पाच पांडव बैल तयार केले जातात. त्यांची मनोभावी पूजाअर्चा केली जाते. गावातील मंडळींबरोबरच बाहेरगावी असलेली मंडळी, नोकरदार मंडळी अशा सर्वांचा मेळा या दिवशी शेतामध्ये जमण्याचे पाहायला मिळतो. गावामध्ये एकही व्यक्ती राहत नसल्याने मागील दोन तीन वर्षांमध्ये पोलीस प्रशासनाला दवंडी देऊन घरातील एकाने तरी गावात थांबा, असं आवाहन करण्याची वेळ आल्याचं शिवाजी जाधव यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 30, 2024 4:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vel Amavasya: मराठवाड्यातील गावांमध्ये शुकशुकाट, वेळ अमावस्या कशी होती साजरी?









