संभाजीनगरमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे भावुक, कार्यकर्त्यांना दंडवत, ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chandrakant Khaire: छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे अत्यंत भावुक झाले होते.
छत्रपती संभाजीनगर : आधीच पक्षाची दोन शकले पडल्यानंतर आणि त्यात विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि काही नेत्यांचा सूर बदलला आहे. पुढची पाच वर्षे विरोधात कशी काढायची? असा सवाल विचारून त्यांना भविष्याची चिंता लागून राहिलेली आहे. पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आणि ज्येष्ठ नेते नंदकुमार घोडेले यांनी शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे भावुक झाले आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. आपण जोरदारपणे काम करू, पुन्हा शिवसेनेला यश मिळवून देऊ पण हे सर्व करायला उद्धवसाहेबांना तुमची साथ हवी आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
माझे काही चुकले तर मला सांगा पण...
शिवसैनिकांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुमच्यासमोर दंडवत घालतो पण पक्ष सोडून जाऊ नका. आपण सर्वजण एकत्र आहोत. जोरदारपणे काम करू, पुन्हा शिवसेनेला यश मिळवून देऊ. माझे काही चुकले तर मला सांगा, मी सुधारणा करेन, माझ्या रागावण्यावर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझा राग थोड्या वेळापुरता असतो, तुम्ही मला बोलू शकता, पण दुसरा काही निर्णय घेऊ नका, अशी भावनिक साद खैरे यांनी घातली.
advertisement
ज्येष्ठ नेते नंदकुमार घोडेले यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशावर खैरे म्हणाले...
नंदकुमार घोडेले यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत मागील आठवड्यात प्रवेश केला. त्यावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, घोडेले यांना त्यावेळी संभाजीनगरचे महापौर करायचे नव्हते. ही माझी भूमिका होती. परंतु नंदकुमार घोडेले हे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मी म्हटलो तर तुला महापौर करेल असे म्हणाले. त्यावेळी मी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नंदकुमार घोडेले महापौर झाले. नंदकुमार घोडेले यांच्या पत्नीला ज्यावेळी अडीच वर्षे महापौर केले, त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये बसून नंदकुमार घोडेले हे महापौरपद गाजवायचे. याचा अर्थ नंदकुमार घोडेले हे स्वार्थासाठी आले होते, आणि स्वार्थासाठी गेले. शिंदे गटात गेल्यानंतर नंदकुमार घोडेले यांना मानपान मिळणार नाही. त्यांना मानसन्मान मिळाला तर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेला निर्णय मी चांगला समजेल, असे खैरे म्हणाले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 12, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे भावुक, कार्यकर्त्यांना दंडवत, ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले...


