पुण्याचे पालकमंत्री कोणते दादा? चंद्रकांत पाटील यांनी लॉजिक सांगितलं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुणे पुस्तक महोत्सवाची सांगत रविवारी संध्याकाळी झाली. सांगता सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुणे : खातेवाटपाचा विषय निकाली लागल्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, यावरून महायुतीत अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातही पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राज्यात चर्चा रंगते आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यापैकी पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार, याविषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून आहे. याच विषयावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.
पुणे पुस्तक महोत्सवाची सांगत रविवारी संध्याकाळी झाली. सांगता सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्याच्या पालकमंत्रिपदाविषयी विचारले असता, पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरते, असे स्पष्टपणे सांगत पक्ष घेईल तो निर्णय मान्य असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
advertisement
खातेवाटप झाले पण पालकमंत्रिपदाचा विषय कधी मार्गी लागेल, असे विचारले असता, तुम्हाला (पत्रकारांना) पण काय काम हवे की नको. जेव्हा खाते वाटप होत नव्हते तेव्हा खातेवाटप कधी असे विचारत होता, आता पालकमंत्रिपदाविषयी विचारत आहात. लवकरच पालकमंत्रिपदे जाहीर करण्यात येतील. सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात चार मंत्री आहेत. त्या प्रमाणात कुणाला पालकमंत्री द्यायचं ह्या सोप्या गोष्टी नाहीयेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
advertisement
पालकमंत्री आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर...
पालकमंत्री पदाबाबत कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही किंवा ठरला असेल तर मला माहित नाही. परंतु पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरते असे आवर्जून चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी माझा पक्ष आणि नेतृत्व जे काही सांगेल ते मी स्वीकारेल, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
...म्हणून पुन्हा उच्च आणि तंत्रशिक्षण खाते मिळाले
तिसऱ्यांदा मला मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तम पद्धतीने केल्यामुळे उच्च आणि तंत्रशिक्षण खाते मला पुन्हा मिळाले, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महापालिका निवडणूक कधी?
महापालिका निवडणुकीबाबत विचारले असता, महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी 22 जानेवारीला आहे. महापालिकेबद्दल आता काहीही बोलणे संयुक्तिक ठरणार नाही. न्यायालयाच्या निर्णयावर यावर बोलता येईल, असे त्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 22, 2024 7:11 PM IST