मी स्टार प्रचारक, खर्च करताना चिंता नको; भर सभेत असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, असा दम चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप जिल्हाध्यक्षाला दिला आहे.
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली : राज्यात नगरपंचायत आणि नगपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक लढवली जात आहे. अर्जभरण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला रंग चढला आहे. सर्वच पक्षांनी जोरात प्रचार सुरू केला आहे. गडचिरोलीत आज भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी सभेसाठी आलेल्या अनेक महिला उन्हामध्ये बसल्या होत्या. यावरून राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले. आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, असा दम देत खर्चाची चिंता करु नका अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
advertisement
गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी काहीजण उन्हामध्ये बसल्याचं दिसून आलं. तेव्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप पूर्ण नाही टाकला, याबाबत विचारणा केली. त्यांनी बजेटचे कारण दिल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरसभेत जिल्हाध्यक्षाला चांगलेच सुनावले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपल्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्या आहेत. त्यांच्यासाठी बजेटची कारणं नका देऊ... निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका. मी स्टार प्रचारक आहे. कशाला हिशेब लागतो. मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ. मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नये...
advertisement
2029 पर्यंत काँग्रेस पार्टी किंचित पार्टी होणार : चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडत असल्याचं कारण सांगताना विजय वडेट्टीवार हे नाना पटोले यांचे तोंड बघायला तयार नाही. नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांचा तोंड बघायला तयार नाही. दोघेही मिळून सुनील केदार यांचा तोंड पाहायला तयार नाही. तिघेही मिळून यशोमती ठाकूर यांना विचारत नाही. चौघेही मिळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही विचारत नाही आणि पाचही जण मिळून राहुल गांधीला कोणीही विचारत नाही. काँग्रेस पक्षात मोठा विसंवाद आहे. 2029 पर्यंत काँग्रेस पार्टी किंचित पार्टी राहिल. काँग्रेस पार्टी नेतृत्वहीन झाली आहे, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
November 22, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी स्टार प्रचारक, खर्च करताना चिंता नको; भर सभेत असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?


