आनंदाची बातमी! आता नवी मुंबईतून बंगळुरुसाठी रोज फ्लाइट, जाणून घ्या वेळापत्रक

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. पण उद्घाटनानंतर विमानतळ सुरू नव्हतं. 25 डिसेंबरपासून विमानतळ सुरू होणार आहे.

आनंदाची बातमी! आता नवी मुंबईतून बंगळुरुसाठी रोज फ्लाइट, जाणून घ्या वेळापत्रक
आनंदाची बातमी! आता नवी मुंबईतून बंगळुरुसाठी रोज फ्लाइट, जाणून घ्या वेळापत्रक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. पण उद्घाटनानंतर विमानतळ सुरू नव्हतं. 25 डिसेंबरपासून विमानतळ सुरू होणार आहे. देशातील प्रमुख शहरांसाठी या विमानतळावरून विमानांचं उड्डाण केले जाणार आहे. एयर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट्स देशातील प्रमुख शहरांसाठी आकाशात झेपावणार आहेत. कोणकोणत्या शहरांसाठी एअर इंडियाचं विमान उड्डाण करणार जाणून घेऊया...
आकाशात विमान झेपावण्यासाठी अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सज्ज झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबरपासून विमानतळावरून विमान आकाशात झेपावणार आहे. ज्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने बुकिंग देखील सुरू केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून नवी मुंबई ते बेंगळुरू दिवसाला एक विमानाचं उड्डाण आणि दिल्लीला आठवड्यातून पाच उड्डाणे चालवले जाणार आहे. १ जानेवारीपासून, दोन्ही मार्गांवरील विमानाच्या फेऱ्या दुप्पट केल्या जाण्याच्या शक्यता आहे. बेंगळुरू आणि दिल्ली दरम्यान दररोज दोन उड्डाणे उपलब्ध असतील.
advertisement
वेळापत्रकानुसार, नवी मुंबईहून पहिली विमान सेवा सकाळी 08:55 वाजता बेंगळुरूसाठी निघेल, तर बेंगळुरूहून पहिली परतीचं उड्डाण सकाळी 08:10 वाजता निघेल. दिल्लीची सेवा वर्षाच्या अखेरीपर्यंत मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशा दिवशी चालणार आहे. तर, जानेवारी 2026 पासून दररोज सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नवी मुंबई विमानतळ उघडण्याच्या पहिल्या दिवसापासून उड्डाणे सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. मुंबई आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रासाठी क्षमता वाढवत, भारतातील सर्वात मोठ्या वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या विमानतळासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे." टाटा-समूहाची ही विमान कंपनी सध्या मुंबईतून दर आठवड्याला 130 हून अधिक उड्डाणे चालवते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आनंदाची बातमी! आता नवी मुंबईतून बंगळुरुसाठी रोज फ्लाइट, जाणून घ्या वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement