Cost Cutting: एका झटक्यात 13,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; HRचा मेमो पाहून हाहाकार, हजारो घरांवर संकट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Massive Layoff: अमेरिकेची टेलिकॉम कंपनी वेराइझोनने 13,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करून मोठा धक्का दिला आहे. खर्च कपात आणि पुनर्रचना यामागे मुख्य कारण असून, ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात आहे.
न्यूयॉर्क: अमेरिकेतील प्रमुख टेलिकम्युनिकेशन्स कंपनी वेराइझोन (Verizon) ने 13,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या इतिहासातील नोकरकपातीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी फेरी (Round) आहे. या निर्णयामागे प्रामुख्याने खर्च कपात (Cost Cutting) आणि पुनर्रचना (Restructuring) ही मुख्य कारणे आहेत.
advertisement
वेराइझोनचे सीईओ डॅन शुलमन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये स्पष्ट केले आहे की, गुरुवारपासून नोकरकपातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुलमन यांच्या मते कंपनीची सध्याची खर्च रचना (Cost Structure) ही कंपनीच्या भविष्यातील गुंतवणुकीच्या क्षमतेवर मर्यादा आणत आहे. विशेष म्हणजे शुलमन यांनी गेल्या महिन्यातच वेराइझोनच्या सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
advertisement
मुख्य मुद्दे आणि कारणे:
या कपातीची बातमी सर्वात आधी 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिली होती.
ऑपरेशन्स सुलभ करणे: असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार सीईओ शुलमन यांनी पत्रात लिहिले आहे की, कंपनीला आपले कामकाज (Operations) सोपे आणि सुलभ करण्याची गरज आहे. यामुळे कंपनीचा वेग मंदावणारी गुंतागुंत आणि अडथळे दूर होतील, ज्यामुळे ग्राहकांना होणारा त्रासही कमी होईल.
advertisement
आउटसोर्सिंगमध्ये कपात: कंपनी आपल्या आउटसोर्सिंग आणि बाहेरील कंत्राटी कामगारांवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी मदत: कंपनी सोडणाऱ्या कामगारांसाठी वेराइझोनने 2 कोटी डॉलर्सचा (सुमारे 160 कोटी रुपये) 'रीस्किलिंग आणि करिअर ट्रान्झिशन फंड' तयार केला आहे, जेणेकरून त्यांना नवीन नोकरी शोधण्यास मदत होईल.
advertisement
कर्मचाऱ्यांची संख्या आणि कपातीचा तपशील:
एकूण कर्मचारी: सिक्युरिटी फाइलिंगनुसार 2024 च्या अखेरीस वेराइझोनमध्ये सुमारे 1,००,००० (एक लाख) पूर्णवेळ कर्मचारी होते.
कपातीची टक्केवारी: सध्याच्या कपातीमध्ये प्रामुख्याने मॅनेजमेंट वर्कफोर्सला लक्ष्य केले जात असून, यातील सुमारे 20% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे.
advertisement
स्पर्धेचा फटका: वेराइझोनला वायरलेस फोन आणि होम इंटरनेट या दोन्ही क्षेत्रात AT&T आणि T-Mobile सारख्या मोठ्या स्पर्धकांकडून कडक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नवीन नेतृत्वाने कंपनीची दिशा सुधारण्यावर भर दिला आहे.
आर्थिक स्थिती (जुलै-सप्टेंबर 2025 तिमाही):
advertisement
कमाई (Earnings): 4.95 अब्ज डॉलर्स.
महसूल (Revenue): 33.82 अब्ज डॉलर्स.
ग्राहक संख्या: कंपनीच्या प्रीपेड वायरलेस सर्व्हिसच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली असली तरी, पोस्टपेड कनेक्शनमध्ये 7,००० ची घट झाली आहे.
इतर कंपन्यांमध्येही कपातीचे सत्र:
केवळ वेराइझोनच नाही तर इतर अनेक बड्या कंपन्यांनीही अलीकडे मोठ्या प्रमाणावर नोकरकपात जाहीर केली आहे:
Amazon, UPS आणि Nestlé सारख्या कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात सुरू आहे.
काही कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन दर (Tariffs) आणि ग्राहकांच्या खर्चातील बदलामुळे वाढलेल्या ऑपरेशनल खर्चाला जबाबदार धरले आहे. तर काही कंपन्या मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट पुनर्रचना करत आहेत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये पैसा गुंतवण्यासाठी मनुष्यबळ कमी करत आहेत. यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 6:59 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Cost Cutting: एका झटक्यात 13,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; HRचा मेमो पाहून हाहाकार, हजारो घरांवर संकट


