Alcohol Fact : बीअर-व्हिस्की एकत्र पिणे धोकादायक? दारू कॉक्टेल केल्याने जास्त नशा होते का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कॉक्टेल केलं तर दारु चढते. बिअरसोबत व्हिस्की किंवा वाईनसोबत वोडका प्यायल्यास जास्त 'किक' मिळते, असा त्यांचा समज असतो. दारू पिणाऱ्यांमध्ये हा एक अतिशय सामान्य समज आहे. पण, खरंच असे होते का?
अनेकदा दारू पिणारे लोक असे म्हणतात की, "जास्त प्रकारच्या दारू मिक्स (Mix) केल्याने नशा जास्त चढते." म्हणजे, कॉक्टेल केलं तर दारु चढते. बिअरसोबत व्हिस्की किंवा वाईनसोबत वोडका प्यायल्यास जास्त 'किक' मिळते, असा त्यांचा समज असतो. दारू पिणाऱ्यांमध्ये हा एक अतिशय सामान्य समज आहे. पण, खरंच असं होतं का?
advertisement
दोन वेगवेगळ्या प्रकारच्या दारू एकत्र प्यायल्याने नशा खरंच वाढते की, हा केवळ एक गैरसमज आहे? आपल्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी, त्यामागील वैज्ञानिक सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की, दारू मिक्स केल्याने जास्त नशा चढते की नाही आणि एक्सपर्ट्स याबद्दल काय सांगतात.
advertisement
advertisement
जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दारू एकत्र करून पिता, तेव्हा काय होते, ते समजून घेऊया.तुम्ही बिअरसोबत व्हिस्की प्या किंवा वाईनसोबत वोडका, यामुळे फक्त त्या पेयाची चव (Flavor) आणि टेस्ट (Taste) बदलते. तुमच्या शरीराच्या रक्तात इथेनॉल (Ethanol) नावाचा अल्कोहोलचा घटकच शोषला जातो, मग तुम्ही तो कोणत्याही पेयातून घेतली असो. सोनल हॉलंड स्पष्ट करतात की, मिक्सिंग कितीही करा, नशा ही तुम्ही एकूण किती अल्कोहोल (इथेनॉल) शरीरात घेतले आहे, यावरच अवलंबून असते. 'दोन ड्रिंक मिक्स केल्या, म्हणून जास्त चढली' हे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बिअर (Beer): साधारणपणे 5% ते 12% पर्यंत (काही खास बिअरमध्ये जास्तही असू शकते).वाईन (Wine): 8% ते 15% पर्यंत.रेड वाईन (Red Wine): 12% ते 15%.व्हाईट वाईन (White Wine): 8% ते 12%.स्पार्कलिंग वाईन/शैम्पेन (Sparkling Wine/Champagne): 10 % ते 12 %.देसी दारू: 20 % ते 40 % पर्यंत (राज्यानुसार आणि बनवण्याच्या प्रक्रियेनुसार बदलू शकते).
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एकूण अल्कोहोलवर लक्ष ठेवा: मिक्सिंग नव्हे, तर तुमच्या पेयातील अल्कोहोलची एकूण मात्राच तुम्हाला किती नशा चढेल हे ठरवते. प्रमाणबद्ध सेवन, नेहमी जबाबदारीने आणि प्रमाणात दारूचे सेवन करा. शरीराचे संकेत ओळखा, तुमच्या शरीराला किती अल्कोहोल सहन होते, हे ओळखा आणि त्या मर्यादेतच सेवन करा. दारू मिक्स केल्याने जास्त नशा होते, हा एक गैरसमज असून, सत्य हे आहे की नशा ही दारूमधील एकूण अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते. सुरक्षित सेवन करणे नेहमीच महत्त्वाचे आहे.


