शेवटच्या क्षणी भाजप नेत्याचा शॉकिंग निर्णय, शिंदे गटाच्या शीतल राऊतांनी 10 वर्षांनी घडवला पुन्हा चमत्कार

Last Updated:

ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ अ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल राऊत या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

News18
News18
ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पहिला विजय मिळाला आहे. प्रभाग क्रमांक १९ अ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल राऊत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजप उमेदवाराने शेवटच्या घेतलेल्या शॉकिंग निर्णयामुळे शीतल राऊतांनी बाजी मारली आहे. २०१५ मध्येही शीतल राऊत बिनविरोध निवडून आल्या होत्या. १० वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी चमत्कार घडवला आहे.
बदलापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १९ अ मधून शीतल राऊत यांच्याविरोधात चार जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीवेळी भाजपच्या कांचन मांडवगडे व महाविकास आघाडीच्या वर्षा चव्हाण यांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर भाजपच्या प्रज्ञा सूर्यवंशी, महाविकास आघाडीच्या उमेदवार मानसी येलवे यांचे अर्ज दाखल होते. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, असं बोललं जात होतं. मात्र शेवटच्या क्षणी भाजपच्या प्रज्ञा सूर्यवंशी आणि मविआच्या मानसी येलवे यांनी शॉकिंग निर्णय घेतला. दोघांनी माघार घेतल्याने राऊत बिनविरोध निवडून आल्या. राऊत यांच्या विजयानंतर पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष केला.
advertisement
हा विजय म्हणजे बदलापूर शहरात शिवसेनेची सत्ता येणार, याचे भाकीत आहे. विरोधकांनी अर्ज मागे घेतला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्यांना लढण्याची ताकद नसल्यामुळे किंवा मैत्रीपूर्ण लढत असेल, असे म्हणून अर्ज मागे घेतले असावेत. मला कोणावरही टीका करायची नाही. मी नगरसेविका म्हणून निवडून आले तरी पक्षातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मी मैदानात उतरणार आहे, असे शीतल राऊत यांनी सांगितले.
advertisement
विशेष म्हणजे २०१५ च्या निवडणुकीत बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यात भाजपच्या तीन आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा समावेश होता. या पाच उमेदवारांमध्ये शीतल राऊत देखील होत्या. यंदा बदलापूरमध्ये केवळ एकच उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. शीतल राऊत यांनी दहा वर्षात पुन्हा चमत्कार घडवल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement

माघारीने वरिष्ठही बुचकळ्यात

शिंदेच्या शिवसेनेची एक जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठांनी यावर बोलणे टाळले. भाजप उमेदवाराने स्वत: हून उमेदवारी अर्ज मागे घेतला की भाजपच्या वरिष्ठांच्या सूचनांनुसार हा निर्णय घेतला याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेवटच्या क्षणी भाजप नेत्याचा शॉकिंग निर्णय, शिंदे गटाच्या शीतल राऊतांनी 10 वर्षांनी घडवला पुन्हा चमत्कार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement