आधीच आठवड्यातून एकदा पाणी, त्यात पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी, छ. संभाजीनगरात...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे. अशातच नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे.

आधीच आठवड्यातून एकदा पाणी, त्यात पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी, छ. संभाजीनगरात...
आधीच आठवड्यातून एकदा पाणी, त्यात पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी, छ. संभाजीनगरात...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी मिळण्यासाठी नागरिकांना आधीच 6 ते 7 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता नवीन 2500 मिमी जलवाहिनीची जोडणी संथ गतीने होत असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सहा दिवसांचे घोषित शटडाऊन पूर्ण झाले असले तरी काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने ते आणखी दोन दिवस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात येणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतील 130 मीटर गॅपपैकी सध्या फक्त 35 मीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 95 मीटरचे काम टाकळी परिसरात सुरू असून ते तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या 900 मिमी पाईपलाईनवर देण्यात आलेला शटडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त लांबला आहे.
advertisement
एमजेपीच्या सूत्रांनुसार, उर्वरित जोडणीसाठी शटडाऊनची आवश्यकता नाही; मात्र टाकळी येथील कठीण काम पूर्ण होईपर्यंत पाणीवाहिनी सुरू करता येणार नाही. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, शटडाऊन वाढल्याने शहरातील पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत झाला आहे. अनेक भागांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असून, नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती वापरापासून हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि व्यवसायांपर्यंत याचा व्यापक परिणाम जाणवत आहे.
advertisement
नागरिकांची प्रतीक्षा वाढत असताना, प्रशासन पुढील दोन दिवसांत काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आधीच आठवड्यातून एकदा पाणी, त्यात पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी, छ. संभाजीनगरात...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement