मी बाहेर निघालेय..., आजीनं सांगितलं, पण शेजारच्या तरुणानं ऐकलंच नाही, उचललं टोकाचं पाऊल, संभाजीनगरात खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: लेकीकडे जायला निघालेल्या आजीने शेजारच्या मुलाला घराबाहेर जायला सांगितलं. याच्या रागातून त्याने टोकाचं पाऊल उचलंलं.
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात अगदी शुल्लक वाटणाऱ्या कारणातून देखील काही लोक अगदी टोकाचे निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरात घडला आहे. ‘मी बाहेर चालले आहे, तू घरातून जा’ असं सांगितल्याने एका मुलाचा पारा चढला. त्याने थेट 70 वर्षांच्या आजीच्या घरालाच आग लावली. बेगमपुरा भागात 19 नोव्हेंबरच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात आरोपी मयूर शिवप्रसाद शर्मा (वय 32) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगरातील शांता आसाराम शिंदे या वृद्धा आपल्या नातवासह पाच वर्षांपासून बेगमपुऱ्यातील तारकस गल्लीतील ॲड. संजय डोंगरे यांच्या घरात राहतात. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर शिवप्रसाद शर्मा हे मुलगा मयूर याच्यासह वास्तव्यास आहेत.
घटनेच्या रात्री शांता शिंदे घरातील कामे आटोपून आपल्या मुलीकडे जाण्यासाठी बाहेर पडत होत्या. त्याच वेळी मयूर त्यांच्या घरात आला. 'मला बाहेर जायचे आहे, तू बाहेर निघून जा' असे म्हणून शांता यांनी त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग मनात धरून दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
रागाच्या भरात मयूरने ‘तुमचे घर जाळून टाकतो’ अशी धमकी दिली. थोड्याच वेळात घरातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. तातडीने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घरातील सामान भस्मसात झाले होते. या प्रकरणी संशय व्यक्त करत शांता शिंदे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मयूर शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 22, 2025 12:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मी बाहेर निघालेय..., आजीनं सांगितलं, पण शेजारच्या तरुणानं ऐकलंच नाही, उचललं टोकाचं पाऊल, संभाजीनगरात खळबळ


