Smriti Mandhana : स्मृतीच्या हळदीला रंगला क्रिकेटचा गेम, टीम Bride कडून Groom टीमचा दारूण पराभव, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Wedding Cricket Game : सांगली स्मृती मानधनाचा विवासोहळा पार पडतोय. अशातच हदळ लागल्यानंतर नवऱ्या मुलाची टीम आणि नवरी मुलीच्या टीममध्ये रंगदार सामना रंगला.
Smriti Mandhana Wedding : टीम इंडियाची वर्ल्ड कप विनर स्टार बॅटर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना आता लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. स्मृती आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच आता दोघांची हळद देखील पार पडली असू त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच हळदीनंतर क्रिकेटची मॅच देखील रंगली.
कॅप्टन पलाशने टॉस जिंकला
टीम ब्राईड आणि टीम ग्रुम यांच्यात सांगलीत मॅच रंगली. कॅप्टन पलाश याने टॉस केला. पलाशने टॉस जिंकल्याचं व्हि़डिओमध्ये पहायला मिळतंय. मात्र, अखेरीस स्मृतीची टीम जिंकल्याचं दिसून आलंय. स्मृतीची टीम हातात विकेट्स घेऊन नाचत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्मृतीच्या टीममध्ये टीम इंडियाच्या तगड्या पोरी असल्याने पलाशच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
advertisement
They actually played cricket...aur annesha idhar bhi commentary kar rahi hain..
This must be fun setup...full match ka video koi dedo pic.twitter.com/Cvrb9Tf1X2
— Poulami Basu (@poulami2991) November 22, 2025
वुमेन्स टीमला सुगीचे दिवस
टीम इंडियाने नुकताच वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता वुमेन्स टीमला सुगीचे दिवस आले आहेत. स्मृती मानधनाचा वर्ल्ड कप विजयात सर्वात मोठा वाटा होता. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पलाशने स्मृतीला प्रपोज केलं अन् आता दोघंही एकमेकांचे आयुष्याचे साथीदार झाले आहेत.
advertisement
they played cricket last night and team #bride won obviously pic.twitter.com/nIXiQkXdDb
— IWCT WORLD CHAMPIONS (@mandyyc0re) November 22, 2025
23 नोव्हेंबरला लग्नबंधनात
दरम्यान, स्मृती पलाशसोबत येत्या 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपासून स्मृती आणि पलाश हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनीही याबाबत कधीही जाहीर भाष्य केलं नव्हतं. इंदूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत पलाशला जेव्हा स्मृतीबाबत विचारलं, तेव्हा तो हसत म्हणाला की, “स्मृती ही इंदूरचीच सून होणार आहे.” या एका वाक्यानंतर त्यांच्या नात्यावरील पडदा जवळपास उघडल्याचं मानलं गेलं होतं.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 22, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृतीच्या हळदीला रंगला क्रिकेटचा गेम, टीम Bride कडून Groom टीमचा दारूण पराभव, पाहा Video


