आई-बाबांसोबतची शेवटची भेट अधुरीच राहिली, गावी निघालेल्या 2 भावंडांना रस्त्यातच काळाने गाठलं, छ. संभाजीनगरमधील घटना

Last Updated:

आडगाव बुद्रुकजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात गावाकडे येत असलेल्या दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : आडगाव बुद्रुकजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात गावाकडे येत असलेल्या दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश संजय सुरडकर (30) आणि त्याची बहीण निशा सुरडकर (25) हे दोघेही नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात राहत होते. रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने (एमएचक्यू 3260) गावाकडे निघाले होते. मात्र आडगाव बुद्रुकजवळ समोरून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गणेशचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेली निशा रुग्णालयात दाखल असताना रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू पावली. करंजखेडा येथे दोघांचेही रविवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
निशा ही छत्रपती संभाजीनगरातील निमाई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती, तर गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सुटीचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी दोघे गावाकडे येत होते. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून तडफडत असलेल्या भावंडांना महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र दोघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले नाही. या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित मोठी बहीण असा परिवार आहे.
advertisement
घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अपघात रात्री घडूनही वडोद बाजार पोलिस सकाळी उशिरा घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस रात्री घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असते तर चौकशी झाली असती, आणि आरोपीला ताब्यात घेणे सोपे झाले असते, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
आई-बाबांसोबतची शेवटची भेट अधुरीच राहिली, गावी निघालेल्या 2 भावंडांना रस्त्यातच काळाने गाठलं, छ. संभाजीनगरमधील घटना
Next Article
advertisement
Tukaram Mundhe: भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात मागणीचं कारण काय?”
BJP आमदारांच्या रडारवर मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात काय होणार?
  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

View All
advertisement