विधानसभेसाठी महायुतीची रणनीती, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ते जागा वाटप, दानवेंनी सगळं स्पष्टच सांगितलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
विधानसभेसाठी आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यापूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभेला अपेक्षित यश न मिळालेल्या महायुतीची विधानसभेसाठी काय रणनीती असणार जागांचं वाटप कसं होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
आज विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही तयार आहोत. सहा तास बैठक चालली, त्यात 288 जागांवर चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघाची माहिती आम्ही दिल्लीला पाठवली आहे. दिल्लीत पार्लमेंट बोर्डमध्ये यादीला अंतिम स्वरुप मिळेल.
आमच्या तिघांमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही, सन्मानाने जागा वाटप होईल. 45 ते 40 दिवस अगोदर कुणी उमेदवार जाहीर करत नाही. निवडणुकीपूर्वी आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही, त्यानंतर आमचे घटक पक्ष ठरवतील असं दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान मी निवडणूक लढवणार नाही, विधानसभा किंवा राज्यसभा मागणार नाही. मी संघटनेसाठी काम करणार असं देखील यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
विधानसभेसाठी महायुतीची रणनीती, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ते जागा वाटप, दानवेंनी सगळं स्पष्टच सांगितलं