छ. संभाजीनगर-हैदराबाद विमानसेवा 16 ते 31 डिसेंबर रद्द, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Sambhajinagar Hyderabad Flight: छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमानसेवा 16 ते 31 डिसेंबर या काळात रद्द राहणार आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या या निर्णयाने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : इंडिगो एअरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर येथून आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारी हैदराबाद विमानसेवा 16 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी रद्द केली आहे. या निर्णयामागे कंपनीने 'ऑपरेशनल रिझन' हे कारण दिले आहे. मात्र, ऐन गर्दीच्या हंगामात अचानक विमानसेवा रद्द केल्याने अनेक प्रवाशांचे पूर्वनियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, अशी ओरड प्रवाशांकडून होत आहे.
रद्द झालेल्या विमानाचे वेळापत्रक
इंडिगो एअरलाइन्सकडून हैदराबादसाठी दररोज विमानसेवा दिली जाते, त्यासोबतच आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार आणि शुक्रवार) उड्डाण घेणारी दुसरी सेवाही सुरू आहे. आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे हे विमान 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान तात्पुरते रद्द करण्यात आले आहे.
advertisement
वेळापत्रक (रद्द झालेल्या सेवेचे)
हैदराबादहून छत्रपती संभाजीनगरकडे: सकाळी 10:55 वाजता उड्डाण आणि दुपारी 12:25 वाजता शहरात आगमन.
छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादकडे: दुपारी 12:55 वाजता उड्डाण आणि दुपारी 2:20 वाजता हैदराबादला आगमन.
इंडिगो एअरलाइन्सच्या या अचानक घेतलेल्या निर्णयावर 'एटीडीएफ' (ATDF) चे सिव्ह्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "इंडिगो एअरलाइन्सने हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद ही सेवा रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. पर्यटक, व्यावसायिक तसेच लग्न आणि समारंभासाठी प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी डिसेंबर हा पीक सीझन असतो. इंडिगोने शेवटच्या क्षणी ही सेवा रद्द केल्यामुळे प्रवाशांचे संपूर्ण नियोजन गोंधळात पडले आहे." इंडिगोने ही सेवा तात्पुरती रद्द केल्याची माहिती दिली असून, प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 03, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगर-हैदराबाद विमानसेवा 16 ते 31 डिसेंबर रद्द, कारण काय?


